परभणी, दि. १८ जुलै २०२५ (समाजहित न्यूज वृत्तांत)
मा. आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त बबन तडवी तसेच सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे आणि विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत "स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ" ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज परभणी शहरातील प्रभाग क्रमांक ७, धार रोड येथील दीर्घकाळापासून असलेली आणि अस्वच्छतेचे कारण ठरत असलेली मोठी कचराकुंडी बंद करण्यात आली. या उपक्रमामागे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा उद्देश आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी. घरातील कचरा वेळेत महानगरपालिकेच्या घंटागाडीतच द्यावा, जेणेकरून शहर अधिक स्वच्छ व सुंदर होईल. या वेळी शहर समन्वयक तुराब खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, प्रभागातील मुकदम व सफाई कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

