विशेष लेख
महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुरू केलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी होय. या उपक्रमाचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरीता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा व वेळेचाअपव्यव टाळण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात दर्शनी भागात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारची आतील बाजू, तळमजला येथे हे कार्यालय सुरू आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने कक्षाची आवश्यक असलेल्या सर्व साहित्य व सुविधांनी निर्मिती झाली आहे आणि गुणवत्तापूर्ण काम सुरू झाले आहे.
या कक्षाची रचना पुढीलप्रमाणे आहे. कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी व्यंकटराव इप्पर, सदस्य तथा समाजसेवा अधीक्षक संदीप निळकंठे, सदस्य तथा लिपिक नवनाथ मुतंगे. कक्षाचा ई मेल - cmrfparbhani@gmail.com हा आहे.
योजनेसाठीचे पात्रता निकष – विहीत नमुन्यात अर्ज, वार्षिक उत्पन्न रु. 1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. रुग्ण महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. अपघात असल्यास, एफआयआर / पोलीस डायरी नोंद आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत पुढील आजारांवर मदत मिळते - मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त होऊ शकणारे व्याधी विकार / आजारांची यादी पुढीलप्रमाणे आहे. अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया (cochlear implant) (वय वर्षे २ ते ६), हृदय प्रत्यारोपण (Heart transplant), यकृत प्रत्यारोपण (liver transplant), मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney transplant), फुप्फुस प्रत्यारोपण (Lung transplant), अस्थी मज्जा प्रत्यारोपण (Bone marrow transplant), हाताचे प्रत्यारोपण (Hand reconstruction surgery), खुब्याचे प्रत्यारोपण (Hip replacement), कर्करोग शस्रक्रिया (Cancer Surgery), कर्करोग औषधोपचार / किरणोपचार (Cancer Chemotherapy), अस्थिबंधन (surgery for ligament injury), नवजात शिशुंचे संबंधित आजार (Diseases of new bornbabies), गुडध्याचे प्रत्यारोपन (Knee Replacement), रस्ते अपघात (Road traffic accidents), लहान बालकांच्या संबंधित शस्रक्रिया (Paediatric surgeries), मेंदुचे आजार (Diseases of new Nervous system), हृदयरोग (Cardiac Diseases), डायलिसिस (Dialysis), जळीत रुग्ण (Burn injuries), विद्युत अपघात / विद्युत जळीत रुग्ण (Electric Burn injuries).
आवश्यक कागदपत्रे -विहीत नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो, निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे अंदाज पत्रक, तहसिलदार कार्यालयाद्वारे प्रमाणित चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. (रु. 1.60 लाख प्रती वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे), रुग्णाचे आधार कार्ड / लहान बालकांच्या बाबतीत - बालकाच्या मातेचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधित व्याधी विकार / आजाराचे संबंधी निदनात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफआरआय रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शत्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपणसमन्वय समिती (ZTCC) ची मान्यता, रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी, अर्ज ई-मेल द्वारे पाठविण्यापुर्वी जिल्हाधिकरी कार्यालयातील कक्षामध्ये तपासुन सर्व कागदपत्रे पुर्तता करुनच पाठवावा. सर्व कागदपत्रे एकत्रितरित्या वाचनीय अश्या पीडीएफ स्वरूपात ई-मेल: aao.cmrf-mh@gov.in या ई मेल वर अर्ज पाठवावा, अर्जाची एक प्रत जिल्हा कक्षात जमा करावी.
अर्ज करण्याची प्रक्रिया -- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज पुढील प्रमाणे करावा. मुख्यमंत्री सहायता निधी फॉर्म खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करणे. https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf आपले रुग्णालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अंगीकृत असल्याचे खाली दिलेल्या लिंक वरून निश्चित करावे.
https://docs.google.com/spreadsheets/d/1QUODMYZ8oY1lPyY2vl1dsX4w6MzBfaGB/edit?gid=1178235983#gid=1178235983 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्जामधे नमूद केलेल्या आजारबद्दलची यादी बघून आपला आजार निश्चित करावा. अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला (रु. 1 लाख 60 हजार पर्यंत, चालू वर्षाचा) जोडावे. सहायता निधी संपूर्ण फॉर्म भरून फोटो लावणे. उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे कोटेशन, अपघात झाला असल्यास एफआरआय रिपोर्ट किंवा पोलिस डायरीची प्रत जोडावी ( एमएलसी रिपोर्ट ग्राह्य धरण्यात येणार नाही), अर्जामध्ये नमूद केलेल्या आजाराबद्दलची सर्व कागदपत्रे (एक्सरे, सीटी स्कैन, एमआरआय रिपोर्ट्स,ब्लड रिपोर्ट्स,इत्यादी) संपूर्ण रिपोर्ट जोडावेत. अवयव प्रत्यारोपण असल्यास मॅचिंग रिपोर्ट.
अर्ज स्वीकार झाल्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या लिंकवर बघू शकता किंवा अधिक संपर्काकरिता 18001232211 या क्रमाकांवर चौकशी करू शकता. अर्ज ई-मेलद्वारे पाठविण्यापुर्वी जिल्हाधिकरी कार्यालयातील कक्षामध्ये तपासुन सर्व कागदपत्रे पुर्तता करुनच पाठवावा. सर्व कागदपत्रे एकत्रितरित्या वाचनीय अश्या पीडीएफ स्वरूपात ई-मेल: aao.cmrf-mh@gov.in या ई-मेल वर अर्ज पाठवावा. अर्जाची एक प्रत जिल्हा कक्षात जमा करावी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयाची कोणती अट असते ? (सरकारी/धर्मादाय/मान्यताप्राप्त खासगी रुग्णालय असणे आवश्यक आहे का?) -- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनार्थ उपलब्ध सिमित निधीचा यथोचित वापर व्हावा म्हणून उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य देय नाही. राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते. तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.
एकूण किती रक्कमपर्यंत मदत मिळू शकते? -- आजारांनुसार पुढीलप्रमाणे मदत दिली जाते. नेओनॅटल डिसीज (जन्मापासून 28 दिवसांपर्यंत) (मदत रक्कम रु. 50 हजारापर्यंत), पेडियाट्रिक सर्जरी ( रु. 1 लाख पर्यंत), कोचलिअर इंम्प्लांट (रु. 3 लाखापर्यंत), हर्ट/लिव्हर/किडनी ट्रान्सप्लांट (रु. 2 लाखापर्यंत), डायलॅसिस ( रु. 50 हजारापर्यंत), एचआयपी रिल्पेसमेंट सर्जरी ( रु. 1 लाखापर्यंत), कॅन्सर सर्जरी (रु. 1 लाखापर्यंत), कॅन्सर : केमोथेरेपी/रेडिएशन थेरेपी ( रु. 50 हजारापर्यंत), सर्जरी इन पेशंट ऑफ रोड ट्राफिक ॲक्सिडन्ट ( रु. 1 लाखापर्यंत), कॉन्झरवेटीव्ह मॅनेजमेंन्ट इन रोड ट्राफिक ॲक्सिडन्ट (रु. 50 हजारापर्यंत), ब्रेन डिसीज ( रु. 1 लाखापर्यंत), हर्ट डिसीज (रु. 1 लाखापर्यंत), नी रिप्लेसमेंन्ट ( रु. 50 हजारापर्यंत), बर्न/इलेक्ट्रीक बर्न (रु. 50 हजारापर्यंत).
दि. 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत किती रुग्णांना किती रक्कम मदत म्हणून वितरित करण्यात आली? मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे जानेवारी 2025 ते जून 2025 या 6 महिन्यात परभणी जिल्ह्यातील रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासोबत संलग्नीकृत असलेल्या 30 रुग्णालयांद्वारे आणि आपल्या जिल्ह्यातील काही रुग्ण महाराष्ट्र राज्यात इतर शहरांमध्ये उपचार घेतात. सर्व ठीकाणी उपचार घेणाऱ्या परभणी जिल्ह्यातील एकूण 533 रुग्णांना रू. 4,67,82,000/- (रू. चार कोटी सदुसष्ठ लाख ब्याऐंशी हजार) इतका निधी रुग्णांना देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या मदतीमुळे अनेक गंभीर आजारी रुग्णांना जीवदान मिळाले आहे. रस्ते अपघात, नवजात शिशुंचे संबंधित आजार, कर्करोग शस्रक्रिया, कर्करोग औषधोपचार/किरणोपचार, मेंदुचेआजार, हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात/विद्युत जळीत रुग्ण अशा सर्व गंभीर आजारी रुग्णांना जीवदान मिळाले. या योजनेच्या माध्यमातून मदत मिळालेल्या काही ठळक आणि सकारात्मक उदाहरणांची माहिती -- केशव चंद्रकांत हिंगे, वय 42 वर्षे, रा. मजलापूर ता. पुर्णा या इसमास मोटारसायकल अपघातने मेंदुला मार लागल्यामुळे अतिशय गंभीर अवस्थेमध्ये पार्वती अंभोरे रुग्णालय, परभणी येथे उपचार घेत होते. आठ दिवस बेशुद्ध असलेल्या या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी मधुन रुपये एक लाख रुपयांची मदत मिळाली आणि जीवनदान मिळाले. (मो.नं. 7030733874) मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफसीआरए मान्यता मिळाल्याचा अर्थ काय? आणि त्याचा लाभ काय आहे? -- मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला एफसीआरए FCRA (Foreign Contribution Regulation Act) प्रमाणपत्र मिळाले आहे. सदरील प्रमाणपत्र प्राप्त होणारे महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्यआहे. सदरील प्रमाणपत्रामुळे कक्षाला परदेशी देणगीदारांकडुन देणगी घेता येते. परदेशी देणगीदारांकडुन मिळालेल्या देणगीचा उपयोग रुग्णांना मदत करण्यासाठी केला जातो.
अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष येथे संपर्क साधावा.
-- प्रमोद धोंगडे, जिल्हा माहिती अधिकारी, परभणी

