पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांची माहिती
मानवत ( प्रतिनिधी प्रविण घागरे)मानवत रोड रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्याचा थांबा मिळावा या साठी लवकरच रेल्वेमंत्री श्री अश्विनीजी वैष्णव यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे असे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश दादा विटेकर यांनी दिली मानवत येथील व्यापारी महासंघाच्या वतीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करताना यावेळी त्यांनी सांगितले बैठकीत चर्चा करताना २०१६ मध्ये मानवत रोड ते परळी या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली या मार्गाचे सर्वे झाला या मार्गाच्या पूर्णते साठी राज्य शासनाच्या वतीने या मार्गाला मंजुरी मिळवून तसा प्रस्ताव रेल्वेमंत्री यांच्या कडे पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावर आमदार राजेश दादा विटेकर यांनी सांगितले सदरील रेल्वे मार्गाला उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांची परवानगी मिळाली असून लवकरच मुख्यमंत्री यांची परवानगी घेण्यात येणार आहे या मार्गा साठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे राज्य सरकारच्या वतीने या रेल्वे मार्गासाठी ठराव घेऊन लवकरच रेल्वेमंत्री संसदेच्या चालू अधिवेशनात मागणी करण्यात येणार आहे. यासाठी एक शिष्टमंडळ नेमण्यात येणार आहे बैठकी मध्ये मानवत व रेल्वे स्टेशनला एक्सप्रेसचा थांबा मिळावा म्हणून या बाबत ही चर्चा करण्यात आली आमदार राजेश दादा विटेकर यांनी रेल्वेमंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात म्हटले आहे की मानवत शहर रेल्वे स्टेशन पासून ०६ कि. मी., पाथरी येथे शिर्डी साईबाबा चे जन्मभूमी असलेल्या़ने मानवत रोड रेल्वे स्टेशन पासून पाथरी शहर हे १६ किमी अंतरावर आहे. माजलगाव हे शहर ५५ किमी अंतरावर आहे. सोनपेठ शहर हे ४५ किमी अंतरावर आहे वरील शहरातील यात्रे करूंना व व्यापारांना मानवतरोड रेल्वे स्टेशन हे जवळचे असल्याने उपयुक्त आहे पाथरी येथे शिर्डी साईबाबाची जन्मभूमी असल्याने येथे दक्षिण भारतातून शेकडो साईभक्त मोठ्या प्रमाणावर पाथरी येथे दर्शना साठी येतात मानवत शहर हे कापूस खरेदी विक्रीसाठी मराठवाड्यातील क्रमांक ०१ चे केंद्र आहे येथे जवळपास १६ जिनिंग असल्याने कापूस या गटांनी खरेदीसाठी गुजरात कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा या राज्यातील कापसाची गठ्ठान खरेदी करण्यासाठी व्यापारी मानवत ला येत असतात दक्षिण भारतातून येणाऱ्या शेकडो साई भक्तांना पाथरी साईबाबा जन्मभूमीचे दर्शनाचा लाभ व्हावा या हेतूने मानवत रोड रेल्वे स्टेशनला खालील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा. १) छत्रपती शिवाजी टर्मिनल ते हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस २) हुजूर साहेब नांदेड ते पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, ३) छत्रपती शिवाजी टर्मिनल ते काजीपेट एक्सप्रेस, ४) नरसापुर ते नगरसोल एक्सप्रेस, ५) मुंबईहून येणारी नंदिग्राम एक्सप्रेस, ६) पुणे येथून निजामाबाद जाणारी पॅसेंजर गाडी, ७) मनमाड ते सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस, ८) हुजूर साहेब नांदेड ते फिरोजपुर एक्सप्रेस रेल्वे एक्सप्रेस यांना थांबा मिळावा म्हणून आमदार राजेश दादा विटेकर यांनी रेल्वेमंत्री यांना निवेदनातून मागणी केली आहे. याच बरोबर वरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून मानवत तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अंकुश लाड, भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ट परभणी जिल्हा कार्यकारणीचे संयोजक विजय मंत्री, महिला संयोजिका डॉ. श्रीमती कीर्ती मुंदडा, सहसंयोजक के. डी. वर्मा, महिला प्रतिनिधी सहसंयोजिका सौ. भारती पोरवाल. तसेच माजलगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, मानवत किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कोकर, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज जाधव आंबेगावकर, मानवत कॉटन जीनर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश कत्रुवार व रामनिवास सारडा. मानवत हाडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आश्रोबा कुराडे, भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव प्रा. अनंतराव गोलाईत यांच्या वतीने ही मानवत रेल्वे स्टेशनला वरील रेल्वे गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी आमदार राजेश दादा विटेकर यांनी संसदेच्या चालू अधिवेशनात लवकर एक शिष्टमंडळ मंडळ घेऊन वरील सर्व मागण्या रेल्वेमंत्राकडे देण्यात येणार आहे. या बैठकीला कापड व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, मानवत किराणा व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, मानवत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, कृष्णा बाकळे, मानवत तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय नाईक सदस्य श्याम भाऊ झाडगावकर, इरफान पठाण, सुरेश काबरा, सोमनाथ कडटन, प्रफुल कुमार जैन, दत्तप्रसाद बांगड, बालाजी पोकळे, हिबारे, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जुगल किशोर काबरा, लक्ष्मण गुंडाळे, मा. नगरसेवक राजू भैया खरात यांच्या सह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

