गंगाखेड (प्रतिनिधी अब्दुल रहमान खान पठाण ) पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे डोंगर पिंपळा येथील गु. र. न. 321/2025 कलम 20 (ब) (2), 22 एन.डी.पी.एस. ऍक्ट 1985 मधील पाहिजे फरार आरोपी नामे दत्तराव सिताराम केजगिर, राहणार डोंगर पिंपळा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. स्था.गु.शा. च्या पथकाने त्याची माहिती घेतली असता तो त्याचे शेतात आखाड्यावर असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थागु.शा. च्या पथकाने सापळा रचून आरोपीस डोंगर पिंपळा येथील त्याच्या स्वतःच्या आखाड्यावर ताब्यात घेतले आहे. पुढील कार्यहवाहीस्तव सदर आरोपीस पोलिस स्टेशन गंगाखेड येथे हजर केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री.विवेकानंद पाटील, सपोनी मुत्येपोड साहेब, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, लक्ष्मण कांगणे, निलेश भुजबळ, राहुल परसोड, परसराम गायकवाड, शरद सावंत, सायबरचे गणेश कौटकर यांनी मिळून केली.
"फरार आरोपीच्या स्थागुच्या पथकाने मुसक्या आवळल्या " NDPS Act अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी.
July 01, 2025
0

