गंगाखेड दि. 13 मे (प्रतिनिधी अब्दुल रहेमान खान पठाण) शहरामध्य जागो जागी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दिलकश चौक ते भगवती चौक या मध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायाला मिळत आहे. वारंवार होणाऱ्या या ट्रॅफिक कोंडी ला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्या मुळे नागरिक भांडे, कपडे व लग्नासाठी लागणारे सामान्यांची खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक पार्किंगची व्यवस्था नसल्याने थेट दुकाना समोर आपले वाहने लावत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी ट्रॅफिक, गर्दी निर्माण होत आहे. त्याचबरोबर दिलकश चौक ते भगवती चौक या रस्त्यावरील दुकानदारांनी थेट आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर ठेवल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर छोट्या-मोठे अपघात सुद्धा घडत आहेत. परंतु ट्राफिक पोलीस प्रशासन व प्रचार होत असलेले अतिक्रमणे हटवण्यासाठी गंगाखेड नगरपालिका कुठेतरी कमी पडते की जाणून-बुजून हा सर्व प्रकार होऊ दिला जात आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. गंगाखेड ट्राफिक पोलीस प्रशासन व गंगाखेड नगरपालिका प्रशासन ही नागरी समस्या सोडवेल की नाही याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

