परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) बुद्धगया येथे चालू असलेल्या महाबोधी महाविहार आंदोलनास पाठिंबा म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तर च्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 1949 चा व्यवस्थापन अधिनियम त्वरित रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिकू कडे सोपविण्यात यावे बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात आदि मागण्यांसह जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बिहारचे मुख्यमंत्री, भारताचे राष्ट्रपती यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर पूज्य भन्ते पी.धम्मानंद,अशोक कांबळे.डि.आय.खेडकर, सूर्यकांत सावळे, सुनील पवार, एम.एम .बरे, एम.एम. भरणे, शिवाजी वावळे, सुनील कोकरे, महेंद्र सानके, यशवंत भैय्या भालेराव, संजय बगाटे, बाबासाहेब धबाले,आनंदा भेरजे,डि.एस.खरात, मुकुंद नंद, विश्वनाथ झोडपे,कला भूषण शाहीर लहाडे ,चंद्रकांत लहाने, दीपक पंचांगे यांची उपस्थिती होती.

