परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) 8 मार्च जागतिक महिला दिनांनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिनींचा सन्मान व्हावा या हेतूने "रणरागिणी नारी सन्मान सोहळा 2025" चे आयोजन दिनांक 10 मार्च 2025 रोजी शहरातील मास्टर कॅफे फंक्शन हॉल दर्गा रोड परभणी येथे रुग्ण हक्क संरक्षण समिती, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रमाबाई आंबेडकर शि. प्र. मंडळ परभणी व समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यात कार्यसम्राज्ञी, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष महिला अधिकारी श्रीमती एस.के.भोजने जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. परभणी यांनी समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांना, दिव्यांग योजना, मुला मुलींचे अनुदानित वसतिगृहे, दलित वस्ती सुधार योजना, शालेय विध्यार्थी/विध्यार्थिनी शिष्यवृत्ती, अंतरजातीय विविह योजना, महिला सबळीकरण, सक्षमीकरण तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्या योजनाची जनजागृती करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेऊन या रणरागिणीचा "रणरागिणी नारी सन्मान 2025" सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. श्रीमती एस.के.भोजने जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि. प. परभणी यांना रणरागिणी नारी सन्मान सोहळ्याचे निवड पत्र दिनांक 7 मार्च 2025 रोजी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परभणी श्रीमती अनिताताई सरोदे, आयोजक दिलीप बनकर, प्रमोद अशोकराव अंभोरे, शेख सरफराज, गणेश गाढे, सय्यद अखिल आदींच्या वतीने देण्यात आले आहे.

