कचरूदादा गोडबोले यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी मागील तीन दिवसापासून कचरूदादा गोडबोले यांचे उपोषण सुरू होते. आजच दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मनपा आयुक्त यांना या संदर्भात कारवाही करण्यासाठी पत्र काढले होतें. आज महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कांबळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सोमवारी या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. महानगरपालिका या विषयाच्या संदर्भात गांभीर्याने विचार करत आहे असेही कांबळे सरांनी सांगितले. मनपा प्रशासनाने लेखी पत्र दिल्यामुळे सदरील उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
उपोषण स्थळी आज सायंकाळी मनपा सहाय्यक आयुक्त कांबळे यांनी भेट देत प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र देऊन आपले उपोषण स्थगित करण्यात यावे अशी विनंती केली. या वेळी महानगरपालिका आयुक्त यांचे पी ए, पत्रकार संजय बगाटे, दासराव पुंडगे, रिपाईचे नेते पंडित टोमके, रिपब्लिकन सेनेचे महेंद्र सानके, रिपाई गवई गटाचे नेते पत्रकार भूषण मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे, तालुका अध्यक्ष एम एम बरे, सुभाष जोंधळे, वंचित बहुजन आघाडी चे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, परभणी तालुकाध्यक्ष तथा पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे, पत्रकार सुनील कोकरे, बापूराव मोरे, ज्ञानोबा खरात, साळवे, ॲड धनराज सोनकांबळे आदी उपस्थित होते.


