आखरी श्वासापर्यंत लढणारे थोर क्रांतीकारक-गुणवंत एच.मिसलवाड
नांदेड (समाजहित न्यूज वृत्तांत ) भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर क्रांतीकारक शहिद झाले. त्यापैकीच हे तीन भारतीय स्वातंत्र्य सैनिक क्रांतीकारक म्हणजेच शहिद भगतसिंघ, राजगुरू, सुखदेव हे होत, 30 ऑक्टोबर 1928 ला ब्रिटीश सात सदस्य असलेला सायमन कमिशन लाहोर येथे पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असतांना सायमन कमिशन भेटण्यासाठी आले. त्यांना लाला लजपतराय यांनी गो-बॅक परत जा अशी घोषणा करताच ब्रिटीश अधिकारी जेम्स एस्कॉट यांनी लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यातच त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझादांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थान सोशालिस्ट आर्मीमधील हे तीनही क्रांतीवीर सशस्त्र उठाव करून भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आखरी श्वासापर्यंत लढणारे थोर क्रांतीकारक होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.23 मार्च 2025 रविवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता भारत मातेचे सुपूत्र, थोर क्रांतीकारक, भारतीय स्वातंत्र्य सैनिक शहिद भगतसिंघ, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव यांच्या स्मरणार्थ 94 वा शहिद दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
सर्व प्रथम राज्य परिवहन नांदेड आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक मा.श्री.श्रीनिवास रेणके यांच्या हस्ते शहिद भगतसिंघ, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून शहिद दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, या गोष्टीचा बदला घेण्यासाठी शहिद भगतसिंघ, राजगुरू, सुखदेव यांना ब्रिटीश पोलीस अधिकारी जेम्स एस्कॉटला मारायचे होते पण चुकून गोळी जॉन पी सँडर्स यांच्यावर गोळ्या झाडल्या. तो जागीच ठार झाला. यासाठीच या तीनही क्रांतीकारकांना 23 मार्च 1931 ला ब्रिटिश सरकारने फाशी दिली गेली. त्यांची आठवण भारत देशासाठी तेवत राहण्यासाठी हा शहिद दिन संपूर्ण भारतभर साजरा करून अभिवादन केले जाते. या क्रांतीकारकांचा इतिहास युवा पिढी सहित सर्वांनीच आठवणीत ठेवून समाजाप्रती-देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हरकळ, श्रीनिवास रेणके, पाळी प्रमुख संभाजी जोगदंड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, वाहतुक निरीक्षक शेख मोबीन, वाहतुक नियंत्रक राजेश धनजकर, वरिष्ठ लिपीक सुरेश फुलारी, सौ.श्वेता तेलेवार, वैशाली कोकणे, चालक ज्ञानोबा माने, सुरक्षा रक्षक संघर्ष जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

