परभणी (समाजहित न्यूज क्राईम वृत्तांत ) दिनांक ०३/०१/२०२५ रोजी मौजे पारचा शिवारात शेतातील आखाड्यावर परवा शिवार येथे दिनांक ०३/०१/२०२५ रोजी रात्री अनोळखी पाच इसमांनी आखाड्यावर येवून पीडीतेववर शारिरीक अत्याचार करुन त्यांचे पतीला डोक्यावर हत्याराने जखमी करुन जबरदस्तीने सोने चांदीचे दागीन चोरु नेले वगैरे जबाबावरुन विषयात पोस्टे परभणी ग्रामीण येथे गुन्हा दाखल झाला होता. दिनांक २५ मार्च २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातला सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे नामे वारुशी ऊर्फ विष्णुवर्धन ऊर्फ अजित बसवराज पवार वय २५ वर्षे रा वाळूज पत्रा कॉलनी छ. संभाजीनगर जि.छ. संभाजीनगर ह.मु. रेल्वे पटरी जवळ पुर्णा जि परभणी हा सध्या पुर्णा परीसरात लपुन छपून राहत असल्याची गोपनिय व खात्रीशीर माहीती मिळाली सदरची माहीती वरुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने पुर्णा येथून नामे नामे चारुशी ऊर्फ विष्णुवर्धन ऊर्फ अजित बसवराज पवार वय २५ वर्षे रा वाळूज पत्रा कॉलनी छ. संभाजीनगर जि.छ. संभाजीनगर ह. मु. रेल्वे पटरी जवळ पूर्णा जि परभणी यास ताब्यात घेतले सदर आरोपीस पुढील कारवाई कामी पोस्टे परभणी ग्रामीण येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पो.नि.पो.स्टे. परभणी ग्रामीणी श्री. श्रीकांत डोंगरे हे करीत आहेत. सदरची कार्यवाही मा.श्री. रविंद्रसिंह परदेशी पोलीस अधिक्षक परभणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे नेतृत्वात श्री. विवेकांनद पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांचे पथकातील सपोनि मुत्येपोड सोबत एएसआय चटटे, एएसआय जक्केवाड, सुग्रीय केंद्रे, निलेश भुजबळ, किशोर चव्हाण, पोहवा जमीरोददीन फारुखी, पोना जी.डी. गजानन क्षीरसागर, पोशी शरद सावंत, गणेश कौटकर यांनी मिळून केली आहे.
कुख्यात गुंडाला स्था.गु.शा. चे पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले
March 25, 2025
0

