परभणी : ( समाजहित न्यूज वृत्तांत ) परभणी शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी नीरज इंटरनॅशनल हॉटेल येथे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लियाकत अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरले की उद्या दिनांक 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे परभणी जिल्हा पालकमंत्री, मा.ना. मेघना बोर्डीकर यांनी आयोजित केलेल्या जनता दरबार या कार्यक्रमांमध्ये दरबारामध्ये जिल्ह्यातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनता दरबार चे आयोजन करण्यात आले आहे.
![]() |
या जनता दरबारामध्ये 'परभणी शहर संघर्ष समिती' वतीने च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विशाल बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील नागरी सुविधा बद्दल रस्ते, नाल्या, स्वच्छतागृहे, अतिक्रमणे, शहरातील सिग्नल चालू करण्यात यावे, अतिरिक्त लावलेला टॅक्स, न्यायालयीन आदेशानुसार शैक्षणिक संस्थांना (ट्रस्ट ) करापासून मुक्त करण्यात आले आहे तरी सुद्धा मनपाच्या वतीने जादाची सक्तीचे नोटीस देत आहे. जुना डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न, तुंबलेल्या नाल्यांचे प्रश्न, शहरातील धुळीचे प्रश्न, रस्त्यावर अतिक्रमणे, वाहतुकीस अडथळा, शहरातील मुख्य ठिकाणी बंद असलेल्या सीसीटीव्ही चे प्रश्न, मोकाट कुत्र्यांचे प्रश्न, अशा गंभीर प्रश्न जनता दरबार मध्ये मांडण्यात येणार आहे. या सर्व प्रश्नांवर बैठकीमध्ये चर्चा करून हे प्रश्न जनता दरबारामध्ये मांडण्यात येणार आहे. परभणी शहर संघर्ष समिती चे लियाकत अन्सारी, विशाल बुधवंत,सलीम इनामदार गफार मास्टर, जलील पटेल, अजमत खान, मोहम्मद गौस जैन, अरुण कुमार लेमाडे, प्रमोद अशोकराव अंभोरे, शंकर भागवत, वेणु जोगदंड यांनी समयोचित मार्गदर्शन केले या वेळी असलम खान, गणेश गाढे, संदीप वायवळ, शंकर भागवत, दिलीप बोरुळ, जलील पटेल, सय्यद अकबर अली, वेणू जोगदंड, पठाण मुक्तार, संजय शिवभगत, शेख सरफराज, दिलीप बनकर तसेच या बैठकीचे आयोजन तथा प्रास्ताविक बैठीकीचे निमंत्रक एकता सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष अजमत खान यांनी केले. तर आभार प्रदर्शन सय्यद अकबर अली यांनी केले. सूत्रसंचालक सईद अन्सारी यांनी केले.यावेळी परभणी शहर संघर्ष समितीच्या वतीने, जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


