परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) जिल्ह्यात मासरेड करून अवैध देशी दारू, हातभट्टी व रसायण असे एकूण 3060 लिटर दारूचा एकूण 2,21,410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 38 आरोपीतांविरूध्द कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी दिलेल्या आदेशावरून परभणी जिल्ह्यात दिनांक 22/02/2025 रोजी सर्वत्र अवैध दारू वर छापे मारण्यात आले. सदर मास रेड दरम्यान परभणी जिल्ह्यात 38 आरोपीतांविरूध्द 38 केसेस करण्यात आलेल्या असून त्यामध्ये देशी दारूच्या 345 बॉटल जप्त करण्यात आलेल्या असून 3060 लिटर हातभट्टी व रसायण वर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई मध्ये एकूण 2,21,410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यता आलेला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे नेतृत्वात सहाय्यक पोलीस अधीक्षक जिंतूर श्री. जिवन बेनीवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी परभणी ग्रामीण श्री. चंद्रसेन देशमूख, उप विभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर श्री.दिनकर डंबाळे, उप विभागीय पोलीस अधिकारी पूर्णा डॉ. श्री. समाधान पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड डॉ.श्री.दिलीप टिपरसे व पो.नि.स्था.गु.शा.श्री. विवेकानंद पाटील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पो.नि.श्री. चितांबर कामठेवाड, पो.स्टे. नानलपेठ पो.नि.श्री. संजय ननवरे, पो.स्टे. कोतवाली, पो.नि.श्री. श्रीकांत डोंगरे, परभणी ग्रामीण पो.नि.श्री. दिपक कुमार वाघमारे, पो.स्टे. गंगाखेड पो.नि.श्री.सुर्यमोहन बोलमवाड, पो.स्टे. सोनपेठ, पो.नि.श्री.विलास गोबाडे, पो.स्टे. पुर्णा, पो.नि.श्री. दिपक बोरसे, पो.स्टे. सेलू, पो.नि.श्री. महेश लांडगे, पो.स्टे. पाथरी, पो.नि.श्री. बुध्दीराज सुकाळे, पो.स्टे. जिंतूर, स.पो.नि.श्री. दिनेश सुर्यवंशी, पो.स्टे. पिंपळदरी, स.पो.नि. श्री. अशोक जायभाय, पो.स्टे. दैठणा स.पो.नि.श्री. गजानन मोरे, पो.स्टे. ताडकळस, स.पो.नि.श्री. संदीप बोरकर, पो.स्टे. मानवत, स.पो.नि.श्री.दर्शन शिंदे, पो.स्टे. बामणी, स.पो.नि.श्री. सुनिल गोपिनवार, पो.स्टे. बोरी, स.पो.नि.श्री. सुनिल अंधारे, पो.स्टे. चारठाणा, स.पो.नि.श्री. नरसिंग पोमनाळकळ, पो.स्टे. चुडावा असे एकूण 41 अधिकारी व 113 पोलीस अंमलदार यांनी मिळून केली.

