परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) बुद्ध विहार प्रशिक्षण केंद्र बनवून त्यातून व्यक्तीला धम्माचे शिक्षण दिल्यास व्यक्ती सदाचारी बनेल आणि सदाचार हाच मानवी उद्धाराचा पाया आहे,असे प्रतिपादन घनशाम साळवे,प्रमुख,नालंदा धम्म विद्यालय,परभणी यांनी केले. वर्मा नगर,परभणी येथे विपश्यना केंद्रातील बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 20 फेब्रुवारी 2025 गुरुवारी आयोजित कार्यक्रमात विहाराची आवश्यकता या विषयावर ते बोलत होते. पुढे ते म्हणाले बुद्ध पूर्व काळात धर्माच्या प्रभावाने अध्यात्मिकतेला प्रमुख स्थान प्राप्त झाले होते आणि आध्यात्मिक विकासासाठी यज,हवन,जप, तप यावर बल देण्यात येवू लागला होता.परंतु, बुद्धाने वस्तुस्थिती सांगितली ती म्हणजे मानवी दुःख मुक्ती आवश्यक असून,त्या करिता यज,हवन,जप, तप करणे व्यर्थ असून, दुःख,दुःखाचे कारण,दुःख मुक्ती आणि दुःख मुक्तीचा (अष्टांग)मार्ग हे सम्यक ज्ञान अंगीकारणे आवश्यक आहे. म्हणून मानवी दुःख मुक्ती करिता धम्माचा प्रचार प्रसार होन आवश्यक असून,त्यासाठी धम्माचे प्रचारक निर्माण झाले पाहिजे.प्रचारक निर्माण होण्यासाठी बुद्ध विहार प्रशिक्षण केंद्र बनली पाहिजे. प्रारंभी आम्रपाली महिला मंडळ व उपासकांच्या उपस्थितीत तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विपश्यना केंद्र वर्मा नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा भीम नगर पर्यंत रॅली काढण्यात आली. या प्रसंगी भिक्खू एस संघमित्र , भिक्खू मोगलायन यांनी उपस्थिताना त्रिशरण पंचशील दिले. या वेळी ज्येष्ठ बौद्धाचार्य एम एम भरणे, मनपा माजी समाज कल्याण सभापती, नागेश दादा सोनपसारे, बी आर कदम,भिवाजी वाघमारे, हरिभाऊ काळे,देवबा कांबळे, बीबी सांडवे, ॲड विजय काळे, दिगंबर काळे, दिलीप निकाळजे, सरवदे, अन्नपूर्णा सूर्यवंशी, राधाबाई मुळे, अनिता कांबळे,स्वभाव भोसले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तथा सूत्रसंचालन ॲड.राजेंद्र ताटे यांनी केले. या वेळी उपासक,उपशिका व बालक,बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

