नांदेड(समाजहित न्यूज वृत्तांत) आपल्या या भारत देशामध्ये, जगामध्ये मानव कल्याणासाठी अनेक संत, महंत, ऋषीमुनी होऊन गेले त्यापैकीच एक म्हणजे ५५०० वर्षापूर्वी त्रेतायुगात भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांनी रामायण घडण्याअगोदर रामायण या पवित्र ग्रंथाची निर्मिती करणारे महान आद्यकवी म्हणजे भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले, ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. १७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाऐ पर वचन न जाई, रामायण महाकाव्य रचनाकार, संस्कृतचे आद्यकवी भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांनी २४ हजार श्लोक, ७ अध्यायामध्ये रामायण या ग्रंथाची रचना केली असून, पौराणामध्ये चार वेद, सहा शास्त्र, १८ पुराणांपैकी रामायण हा एक ग्रंथ असून याच ग्रंथावर आधारित प्रभू श्रीरामाच्या जीवनातील कालक्रमानुसार बालकांड, आयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड अशा सहा भागांमध्ये विभागले गेले असून आजघडीला आपण सर्वांनीच तुम्ही आम्ही सर्वजण भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांचा आदर्श घेऊन समाजाप्रती देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेणके, पाळीप्रमुख मनोहर माळगे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच, मिसलवाड, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, गुलाम रब्बानी सौ. रेखा माचीनवार, सुनीता हंबे, प्रियंका खरात, वैष्णवी गंदेवार, वाहक दिगंबर जटाळे, चालक जी.पी. कोकरे, कृष्णा पवार, संजय मंगनाळे, शिवचरण मळगे यांची प्रमुख उपस्थिती होती, याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) परभणी येथील शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वित्तीय गुंतवणूक जागरूकता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सारिका लोहाना उपस्थित होत्या. तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अतंर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, तत्वज्ञान विभागप्रमुख डॉ. स्वाती कुलकर्णी व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश भालेराव उपस्थित होते. या कार्यशाळेची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी डॉ. सारिका लोहाना यांनी वित्तीय गुंतवणूक कशी फायदेशीर राहू शकते तसेच त्यामध्ये कोणते धोके आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच वित्तीय साक्षरता वाढीस लागावी यासाठी वित्तीय गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रतिपादन केले. यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी सध्याच्या काळात वित्तीय जागृकत्ता किती महत्वाची आहे याबाबत भाष्य केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रत्नाकर कांबळे यांनी तर प्रास्ताविक डॉ. रमेश भालेराव यांनी केले.

