
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) परभणी येथील शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वित्तीय गुंतवणूक जागरूकता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सारिका लोहाना उपस्थित होत्या. तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अतंर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, तत्वज्ञान विभागप्रमुख डॉ. स्वाती कुलकर्णी व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश भालेराव उपस्थित होते. या कार्यशाळेची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी डॉ. सारिका लोहाना यांनी वित्तीय गुंतवणूक कशी फायदेशीर राहू शकते तसेच त्यामध्ये कोणते धोके आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच वित्तीय साक्षरता वाढीस लागावी यासाठी वित्तीय गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रतिपादन केले. यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी सध्याच्या काळात वित्तीय जागृकत्ता किती महत्वाची आहे याबाबत भाष्य केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रत्नाकर कांबळे यांनी तर प्रास्ताविक डॉ. रमेश भालेराव यांनी केले.