परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर) जिल्हयातील वहितीत असलेल्या गायरान जमिनीवर होत असलेले सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. परभणी जिल्हयातील अनेक गोरगरीब वंचित समाजातील गायरान धारक शासनाच्या गायरान जमिनीवर अनेक वर्षापासुन वहिती करुन गायरान जमीन कसत आहेत. सदरील गायरान जमिनी ऐवजी त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही सर्व कुटुंबाची उपजिवीका त्यावरच चालते. त्यामुळे शासनाने हा न्यायकारक निर्णय रद्द करवावा अन्यथा लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडी जि.परभणी च्या वतीने शासनाच्या विरोधात तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर, प्रल्हाद मस्के, बाबुराव नाटकर, अनंता मस्के, ज्ञानोबा गायकवाड, बंडू कांबळे, विजय कांबळे, प्रभाकर मस्के, गौतम नाटकर, बुद्ध भूषण नाटकर, माधव साबळे, आशोक घुले, बाबुराव मस्के, लक्ष्मण मस्के, दशरथ मस्के, केशव साबळे, यशवंत सोनवणे, रतन मोरे, राजू पवार, शेख रमजान, भारत कसणे, शेख युसुफ, सचिन कांबळे, दीपक पंचांगे, राजीव वाटुरे आदींसह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


