परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) परभणी शहरातील नेहरू नगर जिंतूर रोड येथील रहिवाशी असलेल्या फिर्यादी आम्रपाली गौतम वैराट यांनी त्यांच्या पतीला नामे गौतम वैराट यांना घर खर्चासाठी पैसे मागितल्याचा कारणावरून फिर्यादी आम्रपाली वैराट यांना बेदम मारहाण झाल्याची घटना नानलपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.
अधीक माहिती अशी की, दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजल्याचा सुमारास फिर्यादी पत्नी आम्रपाली वैराट यांनी त्यांचे पती गौतम वैराट यांना घर खर्चासाठी रुपये मागितले. रुपये का मागितले या कारणावरून आरोपी गौतम वैराट याने आम्रपाली वैराट यांना लाथा बुक्यांनी तोंडावर, पाठीला, पोटाला बेदम मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या संदर्भात सदरील फिर्यादी महिलेवर 3 दिवस परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू होता. आम्रपाली वैराट यांच्या फिर्यादी वरून गौतम पांडुरंग वैराट याच्या विरुद्ध दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी कलम 323, 504, 506 भारतीय दंड संहिता प्रमाणे परभणी नानलपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

