मानवत / (समजहीत न्यूज वृत्तांत ) संकट किती ही मोठे असले तरी हिमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोण त्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काही एक कारण नाही असे हॅप्पीनेस प्रोग्राम मध्ये प्रशिक्षक भास्कर मगर यांनी सांगितले. सद्या ईर्षा द्वेषभाव आणि वाढत्या अपेक्षांमुळे आपुलकी लोप पावत चालली आहे समाजातील वाढती स्पर्धा ही देखील तणावाचे एक निश्चित कारण मानले जाते मात्र संकट किती ही मोठे असले तरी हिमतीने सामोरे गेल्यास त्याच्या वर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काही कारण नाही असे प्रतिपादन मानवत तालुक्यातील आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक भास्कर मगर यांनी हॅपीनेस प्रोग्रॅमच्या समारोप प्रसंगी सांगितले. मानवत शहरातील के. के. एम. महाविद्यालयाच्या स्व.पन्नालालजी चांडक सभागृहांमध्ये ०४ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर या पाच दिवसाचे हॅप्पीनेस प्रोग्राम शिबिर आयोजित केले होते या शिबिरात पाच दिवसां मध्ये ताणतणावातून मुक्तता मिळण्या साठी आनंदाकडे वळा या आशया खाली प्राणायाम, सुदर्शन क्रिया, आदि ची सखोल माहिती देत तणावातून बाहेर निघण्यासाठी मदत करण्यात आली. ०८ ऑक्टोबर रोजी या शिबिर कार्यक्रमाचा समारोप झाला समारोप प्रसंगी प्रशिक्षक भास्कर मगर यांनी बोलताना पुढे सांगितले की संकटांना घाबरून कोणाचेही भले झाले नाही देशातील मोठमोठे उद्योगपती कर्ज बाजारी होतात तिथे सामान्य आणि शेतकऱ्यांच्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी तथापि निराशाचे कारण कोणतेही असले तरी कोणीही आपला लाख मोलाचा जीव गमावू नये संदेश त्यांनी यावेळी दिला देशातीलच नव्हे तर विदेशातही तणावंमुक्ती साठी आर्ट ऑफ लिविंग परिवार धडपड करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आनंदाकडे वळा म्हणजे हॅप्पीनेस प्रोग्राम या शिबिराचे आयोजन आर्ट ऑफ लिविंग च्या परिवाराने मानवत शहरात केले होते हे शिबिर ०४ ऑक्टोबर ०८ ऑक्टोबर या काळा मध्ये सकाळी ५:०० ते ८: ३० या दरम्यान घेण्यात आले या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून भास्कर मगर, सूर्य प्रकाश तिवारी, सुनील मामा बोरबने हे होते तर हे शिबिर संपन्न करण्यासाठी स्वयंसेवक दिपक शर्मा, मनीष उपलंचवार, पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार, मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे, राजू बुरलेवार व गोपाळ टोपे यांनी काम केले. या शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून बसवेश्वर तोडकरी, दामोदर बांगड, गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, प्रवीण लाहोटी, राहुल उदावंत, नगर पालिका कर्मचारी राजेश शर्मा, राम भुजबळ, सचिन इंगळे, संजय नाईक, संजय लड्डा, संतोष अग्रवाल, विलास मोरे, आदिती गवते, वंदना इंगोले, कोमल दगडू, निकिता झुटे, शितल गावंडे, ललिता दंतुलवार, लक्ष्मण दंतुलवार प्रताप दहे व प्रशांत दहे होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


