परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर )परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्या अंतर्गत अन्ना भाऊ साठे यांच्या पुतळ्या पासुन दिनांक सात अक्टोंबर पासुन यशवंत काळे नावा चा मुलगा हरवलेला होता. हि माहीती पोलीस स्टेशन कोतवाली येथे प्राप्त होताच पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरिक्षक अरुण पुरी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे पोलीस शिपाई नितीन कजबे यांनी तात्काळ नमुद करून मुलाचा शोध घेऊन सदर मुलगा हा मिळुन आला व त्या मुलाला त्याच्या आई वडीला कडे सोपविण्यात आले या प्रकरणी तपास हा पोलीस शिपाई नितीन कजबे यांनी गुप्त माहिती द्वारे माहिती काढुन मुलाचा शोध घेतला आहे या प्रसंगी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारीवर्ग व मुलाचे आई वडील दिसत आहेत तर कोतवाली पोलीस प्रशासन प्रशासक सतर्क असल्याने हरवलेला मुलगा सापडल्याने या कोतवाली पोलीस प्रशासनाचे कौतुक लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


