मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. वझुर बु. येतील जिल्हा परिषद शाळेत ०७ ऑक्टोबर रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. हि पालक सभा विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम विद्येची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली. दरम्यान पालक सभेत विदयार्थ्यांचा भवितव्य व विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. झेलाजी काळे यांनी प्रास्ताविक केले तर शिक्षक श्री. एन. सी. बोधने, ए. जी. शेख, श्री. विजय वाघ यांनी आपापल्याला वर्गाचा आणि विदयार्थ्यांचा प्रगतीचा लेखाजोखा सभेत मांडला शालेय व्यवस्थापण समिती उपाध्यक्ष मारोती तुपसमुंद्रे, रनजीत चव्हाण यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तर मंचावर वझुर बु. ग्रामपंचायतचे सरपंच श्री. बाळासाहेब चव्हाण, श्री. विठ्ठलराव चव्हाण, श्री. बापू माने व श्री अविनाश वाघमारे यांनी प्रमुख अतिथी म्हणून स्थान स्वीकारले तर रूपाली शिंदे या विद्यार्थीनीने शाळेतील उपक्रम मांडले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचालन श्री. विजय वाघ यांनी केले. यावेळी पालक सभेस विदयार्थ्यांचे पालक व ग्रामपंचायतचे सन्मानिय सदस्य, शालेय व्यवस्थापण समिती सदस्य आणि शाळेतील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
वझुर बु. जिल्हा परिषद शाळेत पालक सभेस पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
October 09, 2023
0
Tags



