संपादकीय
दिनांक 28 सप्टेंबर 2023 ची ही गोष्ट, दुपारचे 12:30 - 01:00 वेळ झाला असावा. मी घरात बसलोलो होतो तेंव्हा माझ्या हॉस्टेल मध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा माझ्या कडे आला आणि म्हणाला "सर, कोणी तरी आजी बाई आपल्या हॉस्टेल मध्ये आल्या आहेत आणि त्यांच्या जवळ एक गाठोडं आहे पण त्या गाठोड्यात काय आहे हे माहिती नाही आणि त्या आजी तुम्हाला आवाज देत आहेत." तेंव्हा कोण असेल हे पाहण्यासाठी मी माझ्या घरच्या दरवाज्यातून डोके बाहेर काढून बाहेर पाहिले. तेंव्हा मला एक 85-90 वर्षांच्या आजी दिसल्या त्यांच्या डोक्यावर एक गाठोडे होते आणि त्यांनी मला पाहताच बाहेर येणास सांगत होत्या.
मी विचार केला आजी बाईंना काही पैशे मागण्यासाठी आल्या असावं असा मनात विचार चालू होता आणि मी त्यांना पैसे देण्यासाठी खिशात हात घालून पैसे चाळत होतो कि आजी बाईंना 10 रुपये द्यावे असा माझा विचार. विचार करत करत आजी बाईंना मी म्हणलं "बोला आजी काय पाहिजेत?, इकडे काय काम काढलं?. काही मदत हवी आहे का? " तेंव्हा आजीबाई माझ्या जवळ येऊन डोक्यावरच हळूच गाठोडे खाली ठेऊन गाठोड्याची गाठ सोडत भाजीपाला दाखवत मला म्हणाल्या "बापू, बाळा मी स्वतः शेतातून आंबट चुक्याची भाजी काढून घेऊन विकण्यासाठी फिरत आहे 10 रुपयांची तरी भाजी घे मला घरी साखऱ्या - पत्ती न्यायाची आहे." मी बर म्हणत आजीबाई पाशी बसलो आणि त्यांच्याशी गप्पा मारत मारत त्यांच्या विषयी विचारलं नाव, गावं वैगरे वगैरे.
त्यांच्या सांगण्यावरून वरून आजींचे नाव राधाबाई रा.पेडगाव असं कळलं. पुढे मी आजींना प्रश्न केला "मी आता 10 रुपयाची बाजी घेतल्या नंतर ही उरलेला भाजीपाला घरी घेऊन जाणार आहात का?" तेंव्हा आजींनी उत्तर दिल "नाही बापू घरी नाही नेणार, हा संपूर्ण भाजीपाला विकल्या शिवाय मी घरी जाणार नाही, आता इथून दुसऱ्याला विकेल." असे बोलल्यावर मी त्यांना विचारलं "बर हा सगळा भाजीपाला किती रुपयाचा होतो? " तेंव्हा आजींनी दोन्ही हाताचे मिळून असे सहा बोट दाखवत 60 रुपये म्हणाल्या. मंग मी पुन्हा प्रश्न केला "तुम्ही मंग आता पुढे 5 जणांना 10-10 रुपयाचा भाजीपाला विकण्यापेक्षा हा सगळा भाजीपाला मलाच विकत द्या? तेंव्हा आजींचा चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद मला दिसला. तरी आजींना शंकाच वाटली आणि म्हणाल्या "बापू मजाक नको करू मला जाऊदे. पट पट हा भाजीपाला मला विकायचा आहे आणि घरी जायचं आहे आण 10 रुपये आणि घे ही भाजी." तेंव्हा मी आजींना म्हटलं कि, "आजी मी मजाक करत नाहीये या भाजीपाल्याचे मी तुम्हाला 60 रुपये ऐवजी 100 रुपये देतो खरंच मला द्या हा भाजीपाला." तेंव्हा आजीबाईंना माझ्यावर विश्वास बसला आणि खुश होऊन म्हणाल्या "बापू तुझे खुप उपकार झाले बघ. खुप मोठा हो" असे दोन चार आशीर्वाद दिले. मंग मी आजीबाईंना 100 रुपये देऊन तो सर्व भाजीपाला विकत घेतला. त्यावेळेत मी आजींना चहा, जेवण करण्यासाठी विचारलं तेंव्हा त्यांनी नकार दिला आणि म्हणाल्या आता घरी जाऊन साखऱ्या पत्ती घेऊन चहा पिते. हे आमचं संभाषण 15-20 मिनटं चालले थोडी हसी मजाक पण केली. आजींना पण बोलून छान वाटलं असावं अशीच अपेक्षा पण मला माझ्या मनाला खुप समाधान वाटल यात तीळ मात्र शंका नाही.हे सर्व सांगण्या मागच तात्पर्य असा कि, वयाच्या 85-90 वर्ष्याच्या आजीबाई आपल स्वाभिमान गहाण न ठेवता, कोणासमोर हात पसरून भीक न मागता स्वाभिमानाने भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करत आत्मसन्माने जीवन जगत आहे. सलाम आहे या आजींच्या विचारांना...
कधी आपल्याला अशा निराधार आजीबाई, आजोबा, किंवा अपंग व्यक्ती भीक न मागता स्वाभिमानाने उदरनिर्वाह करण्यासाठी काही वस्तू विकत असताना दिसले तर आपण त्यांना दुर्लक्ष न करता आपल्याच्यानं जितकं शक्य होईल तितकं विकत घ्यावं आणि दुसर्यांना सुद्धा विकत घेण्यास सांगावे. जर आपल्याच्याने विकत घेणं शक्य नसेल तर विकण्यास मदत करावी त्यामुळे त्यांना दोन पैसे मिळतील सोबतच स्वाभिमाने जीवन जगतील, आणि आपल्या मनात सुद्धा समाधान लाभेल...
------------------------------------------
संपादकीय
प्रमोद अशोकराव अंभोरे,
संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठाण तथा सचिव माता माता रमाबाई आंबेडकर शि.प्र.मं. परभणी, तथा परभणी महानगर अध्यक्ष डिझीटल मीडिया परिषद तथा परभणी महानगर सहसचिव मराठी पत्रकार संघ परभणी तथा संस्थापक संपादक समाजहित न्यूज 8530935821




