> रक्त दान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत येथे युथ विंग जमाते इस्लामी हिंद च्या वतीने ईद ए मिलाद अर्थात पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जयंती निमित्त पेठ मोहल्ला मरकज मस्जिद येथे २९ संप्टेबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १०५ रक्तदा त्यांनी रक्तदान केले.
आज ही रक्तदाना बाबत लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो आणि नंतर अनेक रोग होऊ शकतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. रक्तदान ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया यावेळी सलीम बागवान यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना दिली. या शिबिरास मानवत पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार, उपनिरीक्षक किशन पतंगे, गोपनीय शाखेचे विलास मोरे, पोलीस पाटील बाळासाहेब काळे यांनी भेट दिली. मानवत नगर परिषदेचे माजी नगरसेवक नियामत खान, हबीब भडके, समाजसेवक शेख मुस्ताक, त्याच बरोबर अनेक प्रतिष्ठित नागरिक व तरूण युवक या वेळी उपस्थीत होते. सदरील रक्तदान शिबिर यशस्वीते साठी सलीम बागवान, नजात पठाण, शेख समीर, अहद राज, सय्यद सरफराज, शेख मोहसीन, कलीम खान, समीउल्ला खान यांच्यां सह मुस्लिम युवक व विविध सामाजिक संघटनाचे सहकार्य लाभले परभणी जिल्हा रुग्णालय येथील रक्त पतपेढी अधिकारी कर्मचारी यांनी रक्त संकलन करण्यासाठी परिश्रम घेतले.संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


