परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, आर.पी. आय. आठवले, समाजहित न्यूज च्या माध्यमातून समाजातील गोर गरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे, गरजू विध्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेचे मार्फत शिक्षण देऊन घडविणारे तसेच वकिली क्षेत्रात अन्याय ग्रस्त लोकांना न्याय पालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे, भुकेल्यानां अन्नदान, फळ वाटप, गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वेळ प्रसंगी रक्तदान असे विविध सामाजिक, शैक्षणिक, न्याय समुपदेशक उपक्रम राबवून समाजसेवा करणारे माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष तथा डोंबिवली कार्याध्यक्ष दयावान सरकार तथा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आर.पी.आय. आठवले तथा कार्यकारी संपादक समाजहित न्यूज महाराष्ट्र ऍड.सुभाष अशोकराव अंभोरे (दुधगांवकर) यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन सहारा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र च्या वतीने "राष्ट्रीय महात्मा गांधी सेवारत्न अवॉर्ड -2023" हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य संयोजन सहारा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवक अजमत खान यांनी केले आहे. हा पुरस्कार सोहळा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी हॉटेल ग्रीन लिफ, विसावा कॅफे पार्क, कन्या प्रशाला समोर, परभणी येथे सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण मराठे असणार आहेत, तर मराठी चित्रपट अभिनेते अनिल मोरे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच विशाल बुधवंत, ॲड. पवन निकम, मलेका गफार, संगीताताई जामगे, जलील पटेल, डॉ. शेख सरवर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अशोक जोंधळे असणार आहेत तर पुरस्कार निवड समिती अध्यक्ष रमाकांत कुलकर्णी हे आहेत.
ऍड. सुभाष अशोकराव अंभोरे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल त्यांना सर्वच क्षेत्रातून अभिननंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

