> ग्रामस्थांची मानवत तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. ईटाळी येथे मोबाईल टॉवर उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी मानवत अप्पर तहसीलदार रंजितसिंग कोळेकर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. धावत्या जीवन शैलीत मोबाईल म्हणजे मान वाचा महत्वाचा घटक बनला आहे. परंतु. ईटाळी येथे असंख्य मोबाईल वापरकर्ते असताना गावात मोबाईल धारकांना रेंज येत नाही त्यामुळे याचा परिणाम ऑनलाईन पेमेंट, सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरी विषयक अर्ज करणे, शेतकऱ्यांचा ऑनलाईन सातबारा काढणे, या सह आदी ऑनलाईन कामे करण्यास सामान्य नागरिकांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. कामा मध्ये पारदर्शकता यावी त्यामुळे अनेक कामे ही ऑनला ईन पद्धतीने केली जात आहेत परंतु हिच ऑनलाईन कामे ईटाळी येथे रेंज अभावी ठप्प झाली असून याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत आहे त्यामुळे मोबाईल धारकांनी महिना भराचे मोबाईल मध्ये भरलेले (रिचार्ज ) पैसे विना वापरता वायफळ जात असून आर्थिक मूर्दंड सहन करावा लागत आहे. तरी याबाबत संबंधित यंत्रनेशी संपर्क करुन गावात मोबाईल टॉवर उपलब्ध करुन द्यावे व ग्रामस्थां ची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिकांचा वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनावर दिलेल्या निवेदनावर बि. के. साळवे, रमेश पंडित, संघपाल ठेंगे, ज्ञानोबा ठेंगे, अमोल गायकवाड, जी. बि. बनसोडे, प्रशांत ठेंगे, बि. के. पोटभरे, संदीप पंडित, धम्मदिप पंडित, बालासाहेब पंडित, विकास ढगे, माणिक कांबळे, अशोक पाटे, बाबा साहेब रणखांबे, धम्मपाल साळवे, राजेश साळवे, ज्ञानोबा घुले, तुळशी राम गवारे, विशाल भोजने, सलीम शेख, हंसराज साळवे, मिलिंद बन सोडे, कचरूबा साळवे, बाबासाहेब घागरमाळे, वचिष्ठ साळवे यांच्या सह ग्रामस्थांचा स्वाक्षऱ्या आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

