लायन्स क्लबच्या वतीने स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन
परभणी (समाजहित न्यूज वृतांत) येथील स्विस अकॅडमी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तय्यबा अजमत खान यांने भव्य चित्रकला स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वल केले आहे. मराठवाडा मुक्तीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व विशाल वट्टमवार यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब च्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर च्या दरम्यान भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मोठ्या गटातून तय्यबा अजमत खान या विद्यार्थिनीने चित्रकला स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्याने. लायन्स क्लब च्या वतीने या विद्यार्थिनीला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात अशोक शेलगावकर, अरुण ( अवि )टाक विशाल तोष्णीवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी तय्यबा खान ही एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा चित्रपट निर्देशक अजमत खान यांची मुलगी आहे. तय्यबा खान विद्यार्थिनीचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
