मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात बाप्पांचे घरोघरी जल्लोषात झाले आगमन आहे. मानवत येथे दिनांक १९ संप्टेबर मंगळवार रोजी लाडक्या बप्पाचे , गणरायाचे घरोघरी आगमन झाले सार्वजानिक गणेश मंडळाचा वतीने आणि ढोल-ताशांचा घुमणारा आवाज गुलाल, फुलांची उधळण करत अगदी उत्साहात गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी बाप्पाचे आगमन झाले या सोहळ्याचा उत्साह मानवत शहरात मोठया प्रमाणात दिसून आला सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.भक्तांच्या गर्दीने शहरांतील रस्ते फुलून गेले होते आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी पाहायला मिळत आहे. ढोल - ताशांचा गजर, फुलांची उधळण करत मूर्ती मंडपात नेण्यात आल्या सार्वज निक गणेश मंडळांतील बाप्पा थाटा माटात स्थानापन्न झाले. गणेश उत्सव निमित्त मुर्ती खरेदी साठी शहरात गर्दी होत असल्याने वाहतूक नियंत्रण, मोबाईल चोरी होऊ नये, आणि खबर दारीचा उपाय म्हणून मानवत पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी, किशन पतंगे ,अंमलदार होमगार्ड यांनी शहरातील मुख्य रस्त्याववरून पायी पेट्रोलिंग करून वाहतुक नियंत्रण करण्यात आले आहे पोलीस प्रशासन शहरातील चौका चौकात सज्ज झाले आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


