परभणी ( प्रतिनिधी प्रदीप लांडगे ) मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या करीता जालना जिल्हयातील अंतरवाला सराटा या ठिकाणी मराठा समाजांचय लोकशाही पध्दतीने सनदशिर मार्गाने आंदोलन करीत होते. शासन आपल्या दारी या दिनांक 08 सप्टेंबर या कार्यक्रमासाठी हे आरक्षण आंदोलन मागे घेण्यात यावे म्हणून आंदोलन कर्त्यांवर शासनाने दबाव आणला होता. मात्र त्या दबावाखाली मराठा समाज आला नाही. म्हणून राज्यकर्त्यांनी आंदोलन हाणून पाडण्यासाठी अमानुष लाठी हल्ला केला, यामध्ये वयोवध्द व लहान मुलानाही जबर मारहाण करण्यात आली. लोकशाही मार्गाने चालु असलेल्या आदोलनाला हुकूमशाही पध्दतीने चिरडण्याचा संतापजनक प्रकाराचा भिमशक्ती जिल्हा परभणीच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे. व मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला मिमशक्ती परभणी जिल्हा यांचा जाहिर पाठींबा देण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी व नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
त्याचबरोबर नगर जिल्हयातील हरेगाव येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, सातारा जिल्हयातील मान येथील मातंग महिलेला भर रस्त्यात झालेली मारहाण, ब्राम्हणगाव ता.सेलू जि.परभणी येथील उपसरपंच शशीकला कांबळे या राजीनामा देत नाहीत म्हणून त्यांचा मुलगा निखिल कांबळे यांची हत्या या सर्व जातीवादी अत्याचाराचा भिमशक्ती जिल्हा परभणीच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे. भविष्यात हे सर्व थांबविण्याकरीता सरकारने विशेष उपाययोजना करुन महाराष्ट्रामध्ये होणारा अन्याय अत्याचार कमी करावा, दलित व मागासवर्गीय समाजाला संरक्षण देण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे ही खेदाची बाब आहे. अशा मागण्यांचे निवेदन भिमशक्ती जिल्हा परभणीच्या वतीने आपल्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. यावेळी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सतीश भीसे, विजयकुमार सुखदेव, रवी सोनकांबळे, सुहास पंडित, विक्रम काळे, दत्तराव नंद, दशरथ कदम, भाऊराव कंठाळे, सुरेश यादव, युवराज कांबळे, अंकुश वानखेडे, विलास साळवे, निवेदनावर आदींच्या स्वाक्षरी आहेत...!
