परभणी (ग्रामीण प्रतिनिधी भारत कनकुटे) जिल्ह्यातील कातनेश्वर गावामध्ये जालना जिल्ह्यातील जराडी गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटलास व त्या गावातील आंदोलन कर्ते मराठा बांधवास पोलिसांकडून झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध म्हणून दिनांक 4 सप्टेंबर रोजी कातनेश्वर गावांमध्ये गावकऱ्यांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या मोर्चाची सांगता करण्यात आली. त्या ठिकाणी गावातील सुशिक्षित नागरिकांनी आपले विचार व्यक्त केले. कातनेश्वर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या आंदोलनाची धगधगती ज्वाला गावोगावी पेटत आहे, आंदोलन दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर आंदोलन करताना मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. तात्काळ मराठा आरक्षण लागू करण्याची मागणी देखील आंदोलनकर्त्याकडून होत आहे.
