परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, संजय गांधी नगर, पांडुरंग नगर, एकता नगर या व इतर प्रभागातील वसाहतीमध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत सुख सुविधा म्हणजेच पिण्याच्या पाण्याकरता पाईपलाईन, आरसीसी नाल्या, सिमेंटचे रस्ते, डांबरीकरणाचे रस्ते, गल्लीबोळात गट्टूचे रस्ते तसेच वैयक्तिक सौचालय, सार्वजनिक शौचालय यासह सर्व प्रकारच्या मूलभूत सुख सुविधा या प्रभागाचे माजी नगरसेवक तथा माजी परभणी शहर महानगरपालिकेचे सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रियाशील तरुण तडफदार कार्यकर्ते विकास प्रभाकर लंगोटे यांचा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर वाशी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बालासाहेब झाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद हिरामण घनसावत, राजाभाऊजी ठाकरे, अनिल झाडे उपस्थित होते श्री विकास प्रभाकर लंगोटे हे गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, ओबीसी आणि उपेक्षित बहुजन समाजाच्या सार्वजनिक विकासासाठी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करून भारतीय संविधानाने प्राप्त करून दिलेल्या सर्व प्रकारचे हक्क व न्याय मागण्यासाठी सदैव सक्रिय असतात. गोरगरिबांचे भले व्हावे त्यांचा विकास व्हावा यासाठी ते सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करीत असतात यामुळेच त्यांचा सत्कार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर वाशी यांच्यावतीने या वसाहत कार्यकर्ते अजय गणेश पंडित, पप्पू खंदारे, संतोष ठाकरे, बापूराव मंडलिक, शिवाजीराव खरात, राहुल वाकळे, गौतम झुंजारे, तुकाराम शिंदे, गोपाळ झाडे, गोविंद झाडे, किशोर उबाळे, प्रमोद खंदारे, इरफान सय्यद, शेख मेहबूब शेख शफी भाई आदींच्या पुढाकारातून करण्यात आला. या कार्यक्रमास या वसाहती मधील बहुसंख्येने युवक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सत्कारला उत्तर देताना श्री विकास प्रभाकर लंगोटे म्हणाले की, "मी गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेचे प्रश्न आणि अडचणी समस्या आणि प्रभागांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे, तशाच पद्धतीचा प्रयत्न भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी समाजाकरिता केलेल्या कार्याची सामाजिक बांधिलकी पत्करून सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न भविष्यातही करेल यात कुठेही कमी पडणार नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या मदतीला जाऊन धावून जाणे या बाबीला माझा अग्रक्रम राहील." कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद बजरंग कावळे, बाबा गायकवाड, रवी गायकवाड, अभय डुमणे, विशाल सुनील झाडे, गोपाळ, दादा झाडे, शेख सलीम शेख सादिक, शेख जमीन शेख जमीर, शेख वजीर, सिद्धार्थ झुंजारे, मतीन कुरेशी, अनिल कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

