विधुत पुरवठा केव्हाही कधीही खंडीत करण्यात येत आसुन लोडशेडिंग कधी ही होत असुन युनुट चे दर तीन रुपय होते तर ते दर आता सात रुपये करण्यात आले. मनपा ने घर पट्टी, नळ पट्टीत व किरायदार ठेवण्यात आले असेल तर त्याचे वेगळे दर आकारल्या जात आहे. म.न.पा प्रशासक मनमानी पणा करीत असुन मनपा प्रशासक आयुक्त यांनी अंगरक्षक सेवेत ठेवून त्यांना दरमहा पगार दिला जातो तर गेल्या चार महिन्यांपासून मनपा कर्मचाऱ्यांना पगार नाही उपासमार व अनंत अडचणींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत असल्याचे लोकश्रेय च्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी दर्गा रोड वरील रस्त्यावर कीमान पैचेस तरी करावे नागरीकांना मनक्याचा त्रास सुरु झालेला दिसत आहे तर गरोदर महिलेची तर रस्त्यात या झटक्याने बाळातीन होवु शकती अशी वाईट अवस्था जानवत आहेत. तर पेट्रोल चे दर एकावन रुपये लिटर तर केंद्र सरकार व हे ट्रिपल इंजिन सरकर हे दोघे मिळुन एकशे आठ रुपये दराने विक्री होत असल्याचे सर्वच क्षेत्रात दर वाढल्याने जनतेला त्रास देवुन लुटण्याचा प्रकार चालु असुन या सरकारचा निषेध व्यक्त करुन सलीम इनामदार यांनी मराठा समाजा च्या आरक्षणास लोकश्रेय चा जाहीर पाठीबा दिला आहे.
या वेळी लोकश्रेय मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष शेख नईम, अब्दुल जब्बार बेलदार, दानीश इनामदार, जहीर बेलदार, शेख अयुब, अजीम बेलदार, दिलीप बनकर यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

