> कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा काम बंद करण्याचा इशारा <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. मंगरूळ बु. येथे ग्रामपंचायत अंतर्गत होत असले ल्या जलजीवन मिशन योजनेची कामे अंत्यत निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार येथील ग्रामपंचायतचे सदस्य यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कडे १४ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील मौ. मंगरूळ बु. येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत परंतु ही कामे अत्यन्त निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये व प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही महत्वकांक्षी योजना राबवली जाते परंतु येथील कामे ही शासनाचा निकषा प्रमाणे केली जात नसून गुत्तेदाराच्या व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने केली जात आहेत यात पाईपलाईनचे खोदकाम एक मीटर असताना केवळ एक ते दिड फूट खोद काम होत आहे त्यामुळे हे काम दीर्घ काळ न टिकता अल्पावधीतच उखडले जाईल असे दिसत आहे. शासनाने काम साध्य होण्याच्या दृष्टीने पुरेपूर निधी उपलब्ध करून दिलेलला आहे परंतु असे असताना गुत्तेदाराच्या व अधिकाऱ्याच्या संगणमताने ही निकृष्ट कामे केली जात आहेत या होणाऱ्या कामाची तात्काळ सखोल चौकशी करावी अन्यथा ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने काम हे बंद करण्यात येईल असा इशारा ही मंगरूळ बु. ग्रामपंचायतचा सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर उपसरपंच प्रल्हाद देशमाने, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कदम, रमेश कांबळे, प्रदीप कदम, उषा कदम, शाहनाजबी शहानूर खा.पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

