> मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती.कोमल सावरे यांचे आवाहन <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त मानवत नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या झेंडावंदन कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मानवत नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
दिनांक १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठया उत्सहात साजरा केला जातो या वर्षी उत्सहात साजरा करण्यात येणार असून मानवत नगर परिषदेत १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७:४५ वाजता मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधव, स्वतंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रतिष्टीत नागरिक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मानवत नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

