प्रारंभी तथागत बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कलशाला पुष्प अर्पित करून अभिवादन केले. तसेच बौद्ध उपासक, उपासकांनी पंचशील त्रिशरण ग्रहण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नालंदाचे कार्याध्यक्ष बी.आर.आव्हाड हे होते. कार्यक्रमाच्य प्रास्ताविकात नालंदाचे सचिव भीमप्रकाश गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करुण देताना "मान्यवरांची पाऊले वलली नालंदाकडे"असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहकोषाध्यक्ष भा.ना.इंगळे यांनी कले. नालंदाचे अध्यक्ष करण गायकवाड हे काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहु शकले नाही. परंतु त्यांनी हा कार्यक्रम लाईव सीसीटीवी वर पाहिला. मंचावर धम्म ज्योति महिला मंडळाच्या अध्यक्ष ललिताताई वाव्हळे उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी कोषाध्यक्ष:प्रा.डॉ.अरूण कुमार लेमाडे, सहसचिव अण्णासाहेब जल्हारे, बी.बी.बडेराव, ज्ञानेश्वर अटकोरे व सर्व पदाधिकार्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे चित्रांकन:डॉ.प्रदीप साळवे, सूरज गायकवाड, प्रा.राजेश दिपके यांनी केले. शेवटी प्रो.डॉ.एम.डी.इंगोले यांनी ऋषिकेश सुलभ लिखीत "धरती आबा" नाटकाच्या केलेल्या मराठी अनुवादाच्या काही प्रति विपस्यना केंद्राच्या वाचकांना भेट दिल्या.
"शांतिपूर्ण समाज निर्मितीसाठी धम्म भावना वृद्धिंगत होने गरजेचे आहे." -प्रो.डॉ.एम.डी.इंगोले
September 06, 2023
0
परभणी:(समाजहित न्यूज वृत्तांत ) 3 सप्टेंबर 2023 रोजी येथील नालंदा विपश्यना केंद्राच्या प्रांगणात बोधिवृक्ष रोपण प्रसंगी वरील वक्तव्य श्री संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड, हिंदी विभाग प्रमुख, हिंदी दलित साहित्य, आंबेडकरी जलसाकार संशोधक, आंबेडकरी चळवळीचं मुक्त विद्यापीठ महाकवी वामनदादा कर्डक यांच्या काव्य साहित्याचे अभ्यासक लेखक,कवी प्रोफे.डॉ.एम.डी.इंगोले यांनी केले. अत्यंत श्रद्धा भावनेने वाढवलेले बोधिवृक्षाचे रोप असल्याचे त्यांनी सांगितले. अनुशंगाने आपण केलेले माझे स्वागत केवळ स्वागत नसून माझी धम्म भावना व जबाबदारी समाजा प्रति वाढवणारे आहे, असे ते म्हणाले. तद्वतच नालंदा विपस्यना केंद्र, धम्म ज्योति महिला मंडळ व डॉ. बाबासाहेब जयंती उत्साह समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाचेही डॉ.इंगोले यांनी कौतुक केले. या उपक्रमातून निश्चितच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मंगल मैत्री व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल. या धम्म केंद्राचा नावालौकीक सर्वदूर पसरेल. डॉ.बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचे पावित्र्य आपण जपाल अशी भावना व्यक्त केली.
Tags

