मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत )
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला ७५ वर्षे पूर्ण झाले असून हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठवाड्यातील जनतेच्या मुक्ती लढ्याला अनन्य साधारण असे महत्व आहे. या लढ्यातील हुतात्म्यांना, या लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र पूर्वक अभिवादन करते. हा लढा आजच्या पिढीला कळावा म्हणून या अमृत महोत्सवी वर्षात व्यापक कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाने केले असल्याचे मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांनी विध्यर्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले. या बाबत अधिक माहिती अशी कि मानवत येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम च्या अमृत महोत्सव निमित्ताने जो कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मानवत नगर पालिका, पंचायत समिती शिक्षण विभाग व तहसील प्रशासन यांच्या सयुंक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या सायकल रॅलीचे उद्धघाटन हिरवा झेंडा दाखवून अप्पर तहसीलदार रणजित सिंह कोळेकर यांनी केले. हि रॅली मानवत नगरपालिका कार्यालय पासून ते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पर्यंत मुख्य रस्त्याने काढण्यात आली या रॅली चे नेतृत्व मानवत नगर परिषद मुख्यधिकारी कोमल सावरे यांनी स्वतः सायकल स्वारी करीत केले. या रॅली मध्ये मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या विद्यर्थिनीनी सहभाग नोंदवला या रॅली चा समारोप जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. या वेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी सांगितले कि भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. परंतु हैद्राबाद, काश्मिर व जुनागढ संस्थांना तील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. हा लढा १३ महिने सुरु होता व या लढ्यात अनेक सुरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . निजाम शरण येण्यास तयार नव्हता, त्यावेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. व शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. असे त्यांनी उपस्थित विद्यार्थीनीना सांगितले. या वेळी अप्पर तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, गटशिक्षण अधिकारी डी. आर रनमाळे, विश्वनाथ बुधवंत, केंद्र प्रमुख शिरीष लोहट, नगर अभियंता सय्यद अनवर, अभियंता अमोल तांदळे, आस्थापना प्रमुख श्रीमती वंदना इंगोले, मुख्याध्यापक गोरोबा बनसोडे, नारायण सोळंके, संजय रुद्रवार, कुसुम कणकुटे, शरद दहे, भगवान बारटक्के , एन. डी. लाड ,भरती भदर्गे यांचे सह केंद्रीय विद्यालयातील सर्व शिक्षक व नगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी, नेताजी सुभाष विद्यालयाच्या विद्यार्थिनी व शासकीय मुलीच्या वसतिगृहातील विध्यर्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

