मुंबई (कार्य. संपादक ऍड.सुभाष अंभोरे) - श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव मध्ये कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन दलित मुलांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण करण्यात आली.हा अत्यंत निर्घृण आणि माणूसकिला काळीमा फासणारा प्रकार आहे. या प्रकरणाची दखल घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी श्रीरामपुर मधील साखरकामगार रुग्णालयात जाऊन तेथे उपचार घेत असलेल्या हरेगाव मधील पिडीत मुलांची भेट घेतली.त्यांचे सांत्वान करुन त्यांना धिर दिला. त्यानंतर ना.रामदास आठवले यांनी हरेगाव ला भेट दिली.
हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची हि ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.या पीडीत मुलांन मध्ये एक मुलगा मराठा समाजाचा आहे. गावगुंडांच्या त्रासाला सर्वच जाती धर्माच्या लोकांना बळी पडावे लागत आहे. झालेल्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षा तर्फे तिव्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाने सुरुवाती पासून पिडीत मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून प्रमूख आरोपी नाना गलांडे हा फरार आहे.या आरेपीला त्वारित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तिव्र भावना पिडीत मुलांच्या कुटुंबियांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे व्यक्त केली.
हरेगाव प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करुन खटला जलद गती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच फिर्यादीला पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची आपण भेट घेणार आहोत तसेच या प्रकरणातील पिडीत मुलांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन प्रत्येकी किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण भेट घेणार असे ना.रामदास आठवले या वेळी म्हणाले.या प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने गावाला भेट देऊन योग्य कारवाई केली. असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
रिपब्लिकन पक्षा तर्फे पिडीत मुलांना प्रत्येकी दहा हजारांची अर्थिक मदत करण्यात आली.पिडीत मुलांच्या कुटुंबाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा आहे. अशी ग्वाही ना.रामदास आठवले यांनी या वेळी दिली.
या प्रसंगी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,रिपाइं चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे,संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,विजय वाकचोरे,राजा कापसे,बाळासाहेब गायकवाड,भिमा बागूल,सुनिल साळवे,पप्पू बनसोडे,रमाताई धिवर,मनालीताई जाधव आदि अन्य मान्यवर उपस्थित होते.

