परभणी (प्रतिनिधी प्रदीप लांडगे) राज्यातील सर्व शासकिय व निम शासकीय कार्यालयात आद्य पत्रकार तथा मराठी पत्रकारीतेची सुरूवात करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा अन्य राष्ट्रीय महापुरूषांच्या बरोबरीने शासकिय व निमशासकिय कार्यालयात लावण्यात यावे या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणी व परभणी महानगर शाखेच्या वतीने आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनात राजकुमार हट्टेकर, लक्ष्मण मानोलीकर, सुरेश नाईकवाडे, प्रभू दिपके, शिवशंकर सोनूने, दत्तात्रय कराळे, संघपाल अढागळे, ए.एम. माजिद, प्रमोद अंभोरे, प्रदीप लांडगे, शैलेश झुटे, संजय घनसावंत, सुनिल सुतारे आदीसह पदाधिकारी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


