सेलू (समाजहित न्यूज वृत्तांत) तालुक्यातील कुपटा येथील ज्ञानोपासक उच्च माध्यमिक विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली. ज्ञानोपासक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल 68 टक्के लागला. यात महेक युसुफखान पठाण या विद्यार्थिनीने 72.83 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. कु. नंदिनी तुकाराम गवळे 72 टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक तसेच कु. रोशनी बन्सी दुधवडे 68.83 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. या परीक्षेमध्ये एकूण 43 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीत 7 द्वितीय श्रेणीत 22 उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी .खा. अँड गणेशराव दुधगावकर , सचिव सौ.संध्याताई दुधगावकर, सहसचिव श्री समीरभाऊ दुधगावकर,मुख्याध्यापक श्री राजेश तलवारे, प्रा. राम राऊत , प्रा. अंगद चट्टे, प्रा. प्रल्हाद काठोळे, प्रा. सदाशिव इंगळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

