परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निमित्ताने आदर्श विद्यालयात गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न झाला. महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मुख्याध्यापक निशित हाके यांनी प्रतिपादन केले की, अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतील नियमित उपस्थिती वाढते, अभ्यासाची गोडी निर्माण होते तसेच बौद्धिक क्षमतेला योग्य वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच करावी, असे आवाहनही त्यांनी केले. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, संचालिका सौ. सरोजिनी गर्नी व सचिव रमण तोष्णीवाल यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता अबोहर, शिंदे, जे. व्ही. कासांडे, अनिता काळबांडे, आर. एम. पी. दोंडशव, पी. एस. काळबांडे, लांडगे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

