छत्रपती संभाजी नगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षात प्रचंड खळबळ माजली आहे.
आगामी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात येणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण मराठवाड्यासह अन्य क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता दिसून येत आहे. सद्यस्थितीत संबंध महाराष्ट्रात विविध कारणांमुळे राजकीय खलबतं ढवळून निघत आहेत. त्यातच मराठा आरक्षण विरोधी वातावरण तप्त करण्याचं काम आरक्षण विरोधकांकडून केलं जातं आहे. या व अशा विविध कारण मिमांसेच्या गर्तेत असलेल्या पोलिसांनी सदर मोर्चा आरएसएसच्या कार्यालयाऐवजी तो जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात यावा अशी विनंती छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी केली आहे.
दरम्यान, हा नियोजित मोर्चा अन्यत्र कुठेही न जाता तो आरएसएसच्याच कार्यालयावर काढला जाईल, असा ठाम निर्धार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले.
ॲड.प्रकाश आंबेडकर पुढे असंही म्हणाले की, आरएसएस ही संघटना अनाधिकृत असून तिची कायदेविषयक अशी कुठलीही नोंद झालेली नाही. तशा प्रकारची कोणतीही नोंद झाली असेल तर पोलिसांनी तिचे नोंदणी प्रमाणपत्र आम्हाला
दाखवावे. तरच आम्ही हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू. दुसरे म्हणजे आरएसएस ही संघटना अनाधिकृत असल्याने तिच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे, तर आमचा मोर्चा रद्द केला जाईल. तथापि या दोन्हीही बाबी सिध्द करुन पोलीस कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार नसतील तर मात्र आमचा हा मोर्चा अन्यत्र कुठेही न जाता तो आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच कार्यालयावर नेला जाईल, हा आमचा ठाम निर्धार असेल, असे ॲड.आंबेडकर यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले. त्यामुळे भयभीत पोलिसांची पूरती तारांबळ उडाली आहे.
एका बाजूला राज्य व केंद्रं ही दोन्ही सरकारं आरएसएसच्याच छत्रछायेखाली वावरत असून मोहन भागवत यांचा या दोन्ही शासन प्रणालीवर प्रचंड दबदबा आहे. तर, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात असलेले राज्यातील गृहखाते राज्यात कार्यरत असल्याने हे पोलीस दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या वंचितद्वारे आरएसएस कार्यालयावरील नियोजित मोर्चाला परवानगी दिली तर पोलिसांना दिली मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शिवाय परवानगी जर नाही दिली तर कायदेविषयक कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही बाबी अत्यंत गंभीर ठरु शकतात. अखेर याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनाच काय ती योग्य अशी पाऊले उचलावी लागतील, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे एवढे निश्चित..!
दत्तात्रय वामनराव कराळे
"""""""""""""""""""""'""""""""'
लोकनेता न्यूज नेटवर्क
संपादक, मराठवाडा विभाग
"""""""""""""""""""""""""""""""""""""""

