डोंबिवली (कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे ) इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. सम्राट अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि सर्व अस्पृश्यता नष्ट करून दिनदलित, वंचित, सोशीत, दुबळ्या समाजाला नवीन जन्म दिला. "अशोक विजयादशमी" हा दिवस बौद्ध समाजासाठी अतिशय महत्वचा ऐतिहासिक दिवस आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त डोंबिवली शहरामध्ये काही काळ प्रभात फेरीचे आयोजन केले जात होते परंतु काळांतराने प्रभात फेरीचे कार्यक्रम बंद झाले, तीच परंपरा कायम ठेवण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन समिती, डोंबिवली यांनी सुचविल्या प्रमाणे डोंबिवली शहरातील बौद्ध समाजाच्या सर्वानुमते बौद्ध समाज डोंबिवली आणि विविध संस्था /संघटना व डोंबिवलीतील शील संपन्न उपासक उपासिका यांच्या सहभागाने गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सम्राट अशोक विजयादशमी दिनी ७१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन डोंबिवली शहरांमध्ये सामूहिकरित्या साजरा करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने भव्य धम्म प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. सर्व बौद्ध बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे माणिकराव उघडे, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ रिपाई आठवले, समाधान तायडे, ठाणे प्रदेश संघटक, रिपाई आठवले, मिनाताई साळवे, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, युवक आघाडीचे शहर अध्यक्ष विकास खैरनार, रवी गायकवाड कार्यध्यक्ष, सचिव ऍड. सुभाष अंभोरे, डॉ. संदीप पाईकराव उपाध्यक्ष, मंगेश कांबळे उपाध्यक्ष, नितीन इंगोले संपर्क प्रमुख, संजय पवार, शिवाजीराव वाटोरे झोपडपट्टी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष, लक्ष्मण उशिरे, अशोक हिवाळे, अक्षय वाटोरे, सिद्धार्थ बलखंडे, वैशालीताई सावर्डेकर अध्यक्षा डोंबिवली शहर महिला आघाडी , प्रमिलाताई सावंत जिल्हा रिपाई नेत्या, शशी पवार, शारदाबाई पवार, मिलिंद रोहिमल, दयानंद गायकवाड, हरिश्चंद्र कांबळे, पिराजी काकडे, रमेश धावे, गौतम डोके, भीमराव पटेकर, किशोर शिंगणे, प्रमिलाताई वावळे, मीना बैसाणे, मंगल शेळके, काशीबाई वाठोरे, सुनिता खरात, भारत हिवाळे, छाया कांबळे, मनोज बैसाणे, विजय शेळके, पंचशीलाबाई शेळके, नितीन शेळके, आर्यन शेळके, श्रेयश अंभोरे तसेच रिपाई आठवले ठाणे प्रदेश, झोपडपट्टी महासंघ, कल्याण डोंबिवली जिल्हा महिला आघाडी, डोंबिवली शहर युवक आघाडी, वॉर्ड कमिटी यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा, सकाळी ७:०० वा. धम्म प्रभात फेरी मार्ग क्र. 1 छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (इंदिरा चौक) डोबिवली पूर्व, धम्म प्रभात फेरी मार्ग क्र. २ सम्राट अशोक चौक, दीनदयाळ रोड, डोंबिवली पश्चिम ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (इंदिरा चौक) डोंबिवली -पूर्व.
पुढील कार्यक्रमः सफायर हॉल, तिसरा मजला, पी.पी. चेंबर, शहीद भगतसिंग रोड, KDMC जवळ, डोंबिवली पूर्व सकाळी ११:०० वा. भन्तेगण बुद्ध वदंना धम्मदेसना, प्रबोधन सभा, दुपारी १:०० वा भोजन दान.



