परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल (इरा) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांचा सन्मान नुकताच 'संबोधी अकादमी महाराष्ट्र' तर्फे करण्यात आला. 13 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील 'संबोधी अकादमी'च्या कार्यालयात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. मदन बापु कोल्हे यांनी गेली 53 वर्षे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून, वयाच्या 78 व्या वर्षीही ते सायकलवरून भ्रमण करत समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत, समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरे (संस्थापक अध्यक्ष, संबोधी अकादमी महाराष्ट्र) यांनी पुष्पगुच्छ, शाल व संविधानाची शासकीय प्रत देऊन सन्मान केला. या प्रसंगी नालंदा बुद्ध विहार समिती परभणीचे अध्यक्ष करण गायकवाड, 'इरा' चे मीडिया चीफ व वैभव ज्वाला चे संपादक आणि चॅनल संचालक पत्रकार देवानंद शंकरराव वाकळे, परभणीचे सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघमारे तसेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे अॅड. बी. एन. काळे हे मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट सामाजिक बांधिलकी व निस्वार्थ पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घ काळ योगदान देणाऱ्या कोल्हे यांचा हा सन्मान म्हणजे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
'इरा' चे प्रदेशाध्यक्ष मदन (बापु) कोल्हे यांचा 'संबोधी अकादमी' तर्फे सन्मान
July 21, 2025
0
Tags

