दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही विद्यालयाचे एच.एस.सी. फेब्रु./मार्च 2025 च्या परीक्षेत घवघवीत यश
जिंतूर (समाजहित न्यूज वृत्तांत) इयत्ता 12 वी एच. एस.सी. निकाल दिनांक 5 मे रोजी लागला. त्यामध्ये जिंतूर तालुक्यातील संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा (बु) या महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालाची उज्वल परंपरा राखली आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी / मार्च 2025 च्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आहे. संत तुकाराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा (बु) या विद्यालयातून एकूण प्रविष्ट विद्यार्थी 370 पैकी 344 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचा निकाल असा की विज्ञान शाखेतील 249 विद्यार्थी पैकी 233 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याचा एकूण निकाल 93.57 % टक्के लागला असून त्यामध्ये महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु. साबू श्रुती नारायण हिने 86.17%, द्वितीय क्रमांक कु. शिंदे प्रथमेश ज्ञानेश्वर 84.33% तर तृतीय क्रमांक कु.गुट्टे श्रेया शिवाजी हिने 83.17% मार्क घेऊन यश मिळवले आहे. तसेच कला शाखेतील 121 विद्यार्थ्यांपैकी 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्याची टक्केवारी 91.73% अशी आहे. कला शाखेमध्ये महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु. होके निकिता सोमेश्वर हिने 80.00% , तर द्वितीय क्रमांक कु. पव्हणे समाधान हिने 76.33% तर तृतीय क्रमांक कु. वाघमारे नंदिनी बाबुराव हिने 74.33% गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण सरासरी निकाल 92.97% इतका लागला आहे. महाविद्यालयाने व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भगवानदादा वटाणे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वरराव वटाणे, सचिव शिवाजीराव वटाणे, प्राचार्य ए.बी. वटाणे, सर्व शिक्षक- प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी संत तुकाराम माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय,धानोरा (बु) जिंतूर आदींच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

