परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) शहर व परीसरात असलेल्या वाहतुक प्रश्नांविषयी आज दिनांक ०६ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीस महानगरपालीका आयुक्त मा. धैर्यशिल जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सा.बां.वि.परभणी श्री संदीप पाटील, उप प्रादेशिक परीवहन श्री आशिष पाराशरे, उप विभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर, श्री दिनकर डंबाळे, राष्ट्रीय महामार्ग येथील CEA श्री ज्ञानोबा ढाकणे, वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री विवेकानंद पाटील, पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस निरीक्षक श्री संजय ननवरे, पोलीस स्टेशन नानलपेठ सपोनि मारुती कारवार, पोलीस स्टेशन नवामोंढा सपोनि श्री. बळीराम बंदखडके, जनसंपर्क अधिकारी सपोनि श्री राजेश मलपिलु, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोउपनि श्री. रोहीदास नाटकर, तसेच वाहतुक शाखेतील अधिकार व अंमलदार सदर बैठकीस उपस्थित होते. बैठकीमध्ये परभणी शहरातील राष्टीय महामार्ग रस्ते त्यावरील असलेल्या समस्या याबाबत तसेच शहरातील उडडान पुलावरील वाहतुक, वाहन पार्किंग करीता निश्चीत ठिकाणे यासह विविध विषयांवर बैठकित चर्चा होवुन त्यानुसार उपाय योजना करुन कार्यवाही करणे बाबत सकारात्मक चर्चा झाली

