परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) दिनांक 30 मे रोजी, परभणी मनपा आयुक्त यांना प्रभाग क्रमांक 3 मधील विविध समस्यांबाबत जनसेवक धम्मदीपभाऊ रोडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.प्रभाग क्र 3 मध्ये माघील ऐक महिन्यापासून नाल्या साफसफाई केलेले मट्रेल हे उचलून न न्हेता तसेच ठेवल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, तसेच नाल्या देखील घाणीमुळे पूर्णपणे भरलेल्या असल्यामुळे मलेरिया, डेंगू,टायफाईड यासारख्या आजारांचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे, मोठ्या नाल्यांमधील गाळ हा जेसीबी द्वारे तात्काळ उचलून घेण्यात यावा, अन्यथा लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विंचू साप निघण्याची देखील शक्यता असल्यामुळे पोलवरील बंद असलेले लाईट तात्काळ सुरु करण्यात यावेत,बऱ्याच ठिकाणी पोलवर लाईट नाही आहेत तिथे लाईट लावण्यात यावेत, मलेरिया डेंग्यू टायफाईड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी फॉगिंग करण्यात यावे, जुन्या ढाप्यांची उंची कमी असल्यामुळे नालीचा गाळ काढण्यास कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण होत असून त्या ठिकाणी नवीन ढापे टाकण्यात यावेत,पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांना पोलवर काम करत असतांना शॉक लागून घातपात होण्याची शक्यता आहे, विद्युत कर्मचारी तसेच सफाई कामगार यांना देखील सुरक्षा उपकरणे रेनकोट सहित तात्काळ देण्यात यावीत, करीमनगर, सरगम कॉलनी, साईबाबा नगर, विश्वास नगर, भीमा कोरेगाव नगर,कुशीनगर, तुळजाभवानी नगर, अंबिकानगर, साईबाबा नगर, सरगम कॉलनी,सागर कॉलनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून देण्यात यावा तसेच कच्च्या नाल्या तयार करून देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यामध्ये त्रास कमी होईल,रमाई घरकुल लाभार्थ्यांना पावसाळ्यामध्ये काम करण्यास अडचण येऊ शकते म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, काही कर्मचाऱ्यांनी बदली व स्वेच्छानिवृत्ती साठी अर्ज दाखल केलेले आहेत, त्याचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, अशे निवेदन आज देण्यात आले,यावेळी त्यांच्यासोबत के के भारसाखळे,अनिकेत खंदारे, अजय सोनसळे, संजय वाघमारे, अभिनंदन गुळवे, अहेमद पठाण, वैभव वाकळे, निखिल गवळे, भगवान जल्हारे, राहुल नंद, यशपाल टोंगराज, सुमेध मगरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

