मानवत (समाजहित न्यूज वृत्तांत) आज दिनांक 30 मे पासून पाथरी आगाराची मानवत ते कोल्हापूर या नवीन एसटी बस सेवाचा थाटामाटात शुभारंभ झाला महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ स्वर्गीय बिंदुमाधव जोशी प्रणित परभणी जिल्हा अध्यक्ष तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियान अंतर्गत परभणी विभागाचे मूल्यांकन समितीचे सदस्य नंदकुमार कुलकर्णी, मानवत किराणा व्यापारी असोसिएशनचे ज्येष्ठ व्यापारी श्री. सत्यनारायण चांडक यांच्या हस्ते मानवत कोल्हापूर गाडीला पुष्पहार घालून व पूजन करण्यात आले मानवत ते कोल्हापूर ही नवीन एसटी सेवा मानवत बस स्थानकातून सकाळी 7. 45 मिनिटाला सुटेल व ही बस पाथरी माजलगाव, कळंब, येरमाळा, बार्शी, पंढरपूर, मिरज, सांगोला, मार्गे कोल्हापूरला रात्री 9:00 वाजता पोहोचेल व परत येताना ही एसटी त्याच मार्गे मानवत ला पोहोचेल मानवत ते कोल्हापूर ही नवीन एसटी सेवा सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ट जिल्हा कार्य कारिणीचे संयोजक श्री. विजय मंत्री व जिल्हा सहसंयोजक के. डी. वर्मा. महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी, मानवत तालुका प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष ॲड. गजानन शिंदे, पाथरी तालुका प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष नितीन पाटील, तसेच भा. ज. प.महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव प्रा. अनंत गोलाईत यांनी एसटी सेवा सुरू करण्यासाठी निवेदना द्वारे मागणी केली होती यांच्यावतीने ही मानवत ते नाशिक मार्गे माजलगाव, अहिल्यानगर, श्रीरामपूर, संगमनेर. नाशिक. मानवत ते जळगाव मार्गे पाथरी, सेलु, जालना, मार्गे जळगाव, मानवत ते धुळे मार्गे पाथरी, सेलु, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चाळीसगाव, मार्गे धुळे. पाथरी ते अमरावती मार्गे मानवत, परभणी, हिंगोली, वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मार्गे अमरावती. तसेच मानवत ते लातूर मार्गे पाथरी, सोनपेठ, परळी, आंबेजोगाई, मार्गे लातूर. पात्री डेपोतून सकाळी साडेसहाला सुटणारी पाथरी ते सोनपेठ ही एसटी सेवा मानवत ते सोनपेठ अशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
मानवत ते कोल्हापूर या नवीन एसटीच्या शुभारंभ प्रसंगी पाथरी आगाराचे अधिकारी धोंडीराम जाधव, मानवत बसस्थानकाचे वाहतून नियंत्रक श्री. माणिकराव तेलभरे, मानवत किराणा व्यापारी असो सिएशनचे श्री. सत्यनारायण चांडक, श्री. सुरेशजी काबरा, श्री. कृष्णा बाकळे, श्री. पुरुषोत्तम खक्के, व श्री. विलास मिटकरी, श्री. जयप्रकाश मिटकरी, श्री. तुकाराम निर्वळ, मानवत तालुका खत विक्रेते असोसिएशनचे श्री. संजय नंदलालजी बांगड, मानवत तालुका औषधी विक्री ते असोसिएशनचे अध्यक्ष व मानवत सोमवंशीय क्षत्रीय समाजाचे शहराध्यक्ष श्री. दिगंबर बाकळे, श्री. कैलास दगडू, मानवत कटलरी व्यापारी असोसिएशनचे व वारकरी वटृमवार, पाथरी आगाराचे अधिकारी धोंडीराम जाधव यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकाश परभणी जिल्हा सहसंयोजक के. डी. वर्मा यांच्या हस्ते मानवत ते कोल्हापूर या नवीन एसटीचे चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मानवत बसस्थानकातील प्रवासी व नागरिक तसेच व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.


