कल्याण (कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे) दिनांक 28/ 2 /2025 रोजी आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण पश्चिम येथे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट अँड असोसिएशन नवी दिल्लीचे अध्यक्ष ॲड. रवि जाधव व ॲड. प्रकाश जगताप यांच्या व कल्याण - डोंबिवली महानगरपालिका विधि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "संविधानाचा सुवर्ण महोत्सव" हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमानिमित्त समाजात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे रिपाइं आठवले पक्षाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिकराव उघडे यांचा तसेच रिपाइं आठवले पक्षाचे कल्याण डोंबिवली युवा जिल्हा अध्यक्ष ॲड. संग्राम बाबा मोरे यांच्या सह 75 सन्माननीय वकील,पत्रकार, डॉक्टर, समाजसेवक, साहित्यिकांचा
शाल, सन्मान चिन्ह (ट्रॉफी), आणि प्रमाणपत्र देऊन आयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ख्यातनाम व्याख्याते ॲड. गणेश शिरसाट हे उपस्थित होते. ॲड. शिरसाट यांनी "भारतीय संविधान" या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. संविधाना विषयी बोलत असताना "सुशिक्षितांमधील संविधानाची निरक्षरता" या बाबत केलेला अभ्यास व प्रत्यक्षात आलेले अनुभव व्यक्त केले.
सरकार आणि न्याय पालिका यांच्या मध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता, संसदेला संविधानात अमर्यादित बद्दल करण्याचा अधिकार असल्याने तत्कालीन सरकारने संविधानात अमर्यादित बद्दल करण्याचा प्रयत्न केला होता परंतू सर्वोच न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने भारतीय संविधानाची मूलभूत तत्व
(बेसिक स्ट्रक्चर) बदल्याचा अधिकार संसदेला सुद्धा नसल्याचं केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या केस मध्ये अधोरेखित केले आहे. या केस चा दाखला देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यायपालिकेला दिली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये संसद ही सर्वोच्च नसून भारतीय संविधान हेच सर्वोच्च आहे असे या केस द्वारे न्यायपालिकेने स्पष्ट केले आहे असे ते म्हणाले.
प्रत्येक विषया बाबतचा निर्णय हा न्याय पालिकेने घ्यावा अशी धारणा नागरिकांमध्ये निर्माण झाली असून केवळ न्याय पालिकेवरच त्यांचा विश्वास शिल्लक राहिला आहे. न्याय पालिका आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असल्याने न्याय पालिकेच्या कार्या बाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी असे सांगितले की, भारतामध्ये न्याय पालिका, शासन आणि प्रशासन यांच्यात शक्तीचे वाटप करण्यात आले आहे. न्याय पालिकेला स्वतःला जुनी पेन्शन योजना लागू करून घेता आली तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून घेता आली नाही. केवळ संविधानाच्या निरक्षरते मुळे त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे असे ते म्हणाले.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या संख्येने वकील सहभागी होते. त्याचे कारण वकिलांना आपल्या अधिकारांची तसेच न्याय हक्कांची जाणीव होती ज्यांना आपले हक्क व अधिकार माहिती असतात ते शांत बसत नाही म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये वकील यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत नागरिकांना आपले अधिकारच माहिती नसल्यामुळे त्यांनासुद्धा अन्याय सहन करावा लागत आहे. नागरिकांना जर संविधानाचे योग्य शिक्षण दिले आपल्या न्याय हक्काचे जाणीव करून दिली तर सामान्य नागरिक सुद्धा अन्याय सहन करणार नाही.
सर्वांनाच संविधानाचे योग्य ज्ञान असेल तर कोणीही नागरिकांची दिशाभूल करणार नाही. खरे खोटे काय हे नागरिकांच्या लक्षात येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे सहजपणे समजेल अशा अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान समाविष्ट करण्यास काहीच हरकत नाही, शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कमीत कमी आठवी ते बारावी पर्यंत प्रत्यक वर्षी एक असे पहिल्या पाच मूलभूत अधिकाराचा जरी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला तरी पुरेसे होईल, ज्याच्या मुळे "सुशिक्षितांमधील संविधानाची निरक्षरता" काही अंशी कमी होईल.
शेवटी ॲड. शिरसाट यांनी उपस्थितांना असे आवाहन केले की, भारतामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्वोच न्यायालय, मंत्रीमंडळ, संसद या पैकी कोणीही सर्वोच्च नाही तर या सर्वांना जन्म देणार भारतीय संविधानच सर्वोच्च आहे, केवळ एवढ जरी समाजातील किमान एका व्यक्तीला तुम्ही पटवून दिलं तर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा उद्देश यशस्वी झाला असे म्हणता येईल.
ॲड. शिरसाट यांचे भाषण ऐकल्या नंतर सर्व उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले तर आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमात माजी न्यायाधीश, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट अँड असोसिएशन नवी दिल्ली अध्यक्ष ॲड. रवि जाधव व वरिष्ठ उपाध्यक्ष तथा कल्याण जिल्हा न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप, कल्याण जिल्हा न्यायालय बार असोसिएशनचे सचिव ॲड. चंद्रकांत वाघमारे,
ॲड. गणेश शिरसाट, कल्याण बारचे सदस्य ॲड. बाविस्कर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विधी विभागातील वकिल बंधू व कर्मचारी, ॲड. माया गायकवाड, रिपाइं ठाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिकराव उघडे, रिपाइं कल्याण डोंबिवली युवा जिल्हा अध्यक्ष ॲड. संग्राम मोरे, रिपाइं डोंबिवली शहर युवा कार्याध्यक्ष रवि गायकवाड, रिपाइं डोंबिवली शहर युवा सचिव ॲड. सुभाष अंभोरे, ॲड. दयानंद घोडेराव, ॲड. सोनवणे, ॲड. कोटांगळे, ॲड. गुलाब खंदारे, रिपाइं ज्येष्ठ नेते समाधान तायडे मंगेश कांबळे, डॉक्टर, समाजसेवक, साहित्यिक, महिला नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


