![]() |
सदर उपक्रमामध्ये पोलीस स्टेशन स्तरावर शासनाकडून, वरीष्ठ अधिकारी कार्यालय तसेच स्थानिक स्तरावर प्राप्त तक्रारी अर्जाच्या निर्गती करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली. सदर मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व सर्व पोलीस स्टेशन स्तरावर शासनाकडून, वरीष्ठ अधिकारी कार्यालयाकडून तसेच स्थानिक स्तरावरील आलेल्या तब्बल 93 तक्रारी अर्जाची निर्गती करण्यात आली. सदरची मोहिम मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्हयातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त तपासी अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.


