परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) शहरातून अपहृत मुलास गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेषनाच्या सहाय्याने पुण्यातून अवघ्या 7 तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले,
परभणी शहरात राहणाऱ्या फिर्यादी यांचा 15 वर्षे 3 महिने वयाचा मुलगा दिनांक 04/03/2025 रोजी चे सायंकाळी 04.30 वाजता शिकवणी साठी गेला परंतू रात्री 09.30 पर्यंत घरी परत आला नाही म्हणून त्यांनी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यास फुस लाऊन पळवून नेले अशा आशयाची तक्रार दिनांक 05/03/2025 रोजी दुपारी 12.17 वाजता दिल्या वरून पोलीस ठाणे नानलपेठ येथे गु.र.नं 82/2025 कलम 137 (2) भारतीय न्याय संहिते प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी साहेबांनी प्रभारी अधिकारी पो.स्टे. नानलपेठ स.पो.नि. श्री. सुशांत किनगे, पो.स्टे. सायबर चे पो.नि. शरद मरे, स.पो.नि. श्री. साईप्रकाश चन्ना यांना सदर मुलाचा तात्काळ शोध घेवून त्यास त्याचे पालकाचे ताब्यात देण्या बाबत आदेश व सुचना दिल्या,
त्यावरून पथक नेमूण तात्काळ रवाना करण्यात आली. पो.स्टे. नानलपेठ चे अधिकाऱ्यांनी त्याचे बाबत गोपनिय चौकशी करून माहिती हस्तगत केली व पो.स्टे. सायबर चे मार्फतीने देखील तांत्रीक तपास व सहाकार्य करण्यात आले. त्यावरून मिळालेल्या माहितीनुसार अपहृत पुणे येथे असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली.
त्यावरून पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी स्वतः पोलीस अधीक्षक पुणे रेल्वे श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक पुणे रेल्वे श्री. राहिदास पवार यांचेशी संपर्क साधून पो.नि. पुणे रेल्वे श्री. खोपीकर यांचे पथकाची अपहृत मुलाचा शोध घेण्यास मदत मिळवून दिली तसेच अपहृत मुलाचे नातेवाईकांची देखील मुलाचा शोध घेण्यास मदत घेण्यात आली.
त्यावरून अपहृत मुलास आज दिनांक 05/03/2025 रोजी 19.00 वाजता पुणे येथून पुणे रेल्वे पोलीसांच्या मदतीन ताब्यात घेण्यात आले. सदर मुलगा भेटल्याने मुलाचे वडील व त्यांचे नातेवाईकांनी नानलपेठ पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल आभार व्यक्त केला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे नेतृत्वात उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर डंबाळे, स.पो.नि. श्री. सुशांत किनगे, पो.उप-नि श्री. अशोक जटाळ, पोलीस अंमलदार सुमेध पुंडगे, उमाकांत सुशे व गणेश कौटकर, स्वप्निल पोतदार ने. सायबर पो.स्टे. पो.नि. पुणे रेल्वे श्री. खोपीकर यांचे पथक यांनी मिळूल केली.

