परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) 4 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती परभणीच्या जिल्ह्याच्याअध्यक्षपदी सौ अनिता बाबासाहेब सरोदे यांची निवड करण्यात आली यावेळी त्यांना निवडीचे पत्र देताना जिल्हाधिकारी अनुरा डालकरी यांच्या हस्ते पत्र देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव प्राध्यापक गौतम मुंडे रुग्ण हक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांची उपस्थिती होती.
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जवळ वंचित बहुजन आघाडी व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी रणजीत मकरंद, अरुण गायकवाड, माजी नगर माजी सभापती नागेश दादा सोनपसारे, गौतम भराडे, सुमंगला पांडुरंग उबाळे, संगीता साहेबराव वाकडे, संगमित्रा साबळे, भाऊ सावळे, वंदना बनसोडे, मीनाताई उघडे, पद्मिनी गंगाधरे, धम्मशिला बनसोडे, सुजाता इंगोले आदी उपस्थित होते.


