डोंबिवली (कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे ) - रिपाइं आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री, भारत सरकार यांचे निकटवर्ती व विश्वासू समजले जाणारे शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती रिपाइं आठवले पक्षाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळ रवि गायकवाड युवा कार्याध्यक्ष, ॲड. सुभाष अंभोरे युवा सचिव, समाधान तायडे रिपाइं जेष्ठ नेते यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डोंबिवली शहरातील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे यांची भेट घेऊन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी आगामी जयंती बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी शिष्ट मंडळाने श्री. हेमाडे यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
सालाबाद प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डोंबिवली शहरात मोठ्या धूमधडाक्या साजरी करण्यात येणार असून नेहमी प्रमाणेच शहरात कुठलाही अनुचित प्रकार न घडता आनंद व उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती श्री. हेमाडे यांना देण्यात आली.
डोंबिवली शहरातील सर्व आंबेडकरी समाजाची व सर्व जयंती मंडळाची गैरसोय होऊ नये म्हणून शिष्ट मंडळाने जयंती बाबतची या वर्षाची मीटिंग मार्च महिन्यातच आयोजित करण्यात यावी अशी मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या कडे करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित केली जाणारी जयंती बाबतची मीटिंग ही एप्रिल महिन्यात म्हणजेच जयंतीच्या काही दिवस आगोदर घेतली जाते, त्यात परिस्थिती प्रमाणे DJ तसेच इतर विषयी बाबत नव नवीन नियम व अटी लादले जातात. नवीन नियम व अट यांची योग्य वेळी माहिती नसल्यामुळे जयंती मंडळाने केलेल्या नियोजनात अचानक बदल करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली जाऊन नाराजी निर्माण होते, त्यातून पोलीस प्रशासनाचा चांगला उद्देश असताना सुद्धा काही समाज कंठक समाजात गैरसमज निर्माण करून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या समस्येवर आळा घालण्यासाठी या वर्षी जयंती बाबतची मीटिंग मार्च महिन्यातच घेण्यात यावी अशी सूचना करत मागणी करण्यात आली आहे. त्या बाबत सकारात्मक विचार केला जाईल असे स.पो. आयुक्त श्री. हेमाडे यांनी आश्वासन दिले.
यावेळी माणिकराव उघडे यांच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त यांना रिपाइं आठवले पक्षाचे नवनिर्वाचित डोंबिवली शहर युवा कार्याध्यक्ष रवि गायकवाड व डोंबिवली शहर युवा सचिव ॲड. सुभाष अंभोरे यांचा परिचय करून देण्यात आला. तसेच दर वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या वतीने साजरी केली जाणारी भीम जयंती या वर्षीही त्यांचे पुतणे रवि गायकवाड यांच्या वतीने त्याच ठिकाणी स्टेज लाऊन नेहमी प्रमाणेच मोठ्या उत्साहात व मोठ्या थाटामाटात साजरी करणार असल्याची माहिती माणिकराव उघडे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त यांना दिली.
शिष्ट मंडळाचे नेतृत्व करणारे रिपाइं आठवले पक्षाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे सोबत डोंबिवली शहर युवा कार्याध्यक्ष रवि गायकवाड, डोंबिवली शहर युवा सचिव ॲड. सुभाष अंभोरे, रिपाइं जेष्ठ नेते समाधान तायडे, मंगेश कांबळे, चंद्रकांत वाढवे, तुषार शेळके, क्षितिज शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




